शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत वित्त आयोगाच्या निधीचे नियोजनच नाही

By admin | Updated: August 26, 2014 00:16 IST

केंद्र सरकारकडून विविध विकास कामांसाठी थेट ग्रामपंचायतींना तेराव्या वित्त आयोगातून निधी दिला जातो. यातील दहा टक्के रकमेची कामे सुचविण्याचा अधिकार जिल्हा परिषद सदस्यांना दिला आहे.

यवतमाळ : केंद्र सरकारकडून विविध विकास कामांसाठी थेट ग्रामपंचायतींना तेराव्या वित्त आयोगातून निधी दिला जातो. यातील दहा टक्के रकमेची कामे सुचविण्याचा अधिकार जिल्हा परिषद सदस्यांना दिला आहे. त्यानंतरही जिल्हा परिषदस्तरावर या निधी वाटपाचे नियोजन वेळेवर होत नाही. परिणामी कामे खोळंबली आहे. याउलट पंचायत समिती आणि ग्रामपंचायतस्तराव हा निधी खर्च होत आहे. तेराव्या वित्त आयोगाच्या असमान निधी वाटपावरून सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षाची कोंडी केली होती. काँग्रेसच्या सीमा तेलंग यांनी तर याचिका दाखल केली. त्यानंतरही वाटपात अनियमितता असल्याने सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. सदस्यांचा दबाव वाढल्याने शेवटी सार्वांना समान निधी वाटप करण्याचा ठराव घेण्यात आला. प्रत्यक्ष तेराव्या वित्त आयोगातील ७० टक्के निधी हा ग्रामपंचायतीला मिळतो. २० टक्के निधी पंचायत समितीस्तरावर दिला जातो. केवळ १० टक्के निधीची कामे सुचविण्याचा अधिकार जिल्हा परिषद सदस्यांना आला आहे. मात्र या १० टक्के निधीतही कामे सुचविण्यात एकसूत्रता दिसत नाही. सत्ताधाऱ्याकडून हा निधी आपल्याच सर्कलमध्ये खर्च करण्याचा प्रयत्न होते. त्यामुळे त्याला वेळेत मान्यात देता येत नाही. जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या रकमेत बसतील इतकी कामे सुचविणे अपेक्षित आहे. त्यानंतर या प्रस्तावित कामांना सर्वसाधारण बैठकीत मंजूरी घेतली जाते. शेवटी ही कामे पंचायत समितीकडून ग्रामपंचायतस्तरावर दिली जातात. ग्रामपंचायतीने नेमलेल्या एजन्सीकडूनच ही कामे करून घेतली जाते. गेल्या काही दिवसापासून कामे सुचविण्यात सुसूत्रताच नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत कोणाला किती काम द्यायचे याचे नियोजन झाले नाही. परिणाम हा निधी अजूनही अखर्चित आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी वित्त आयोगातून मिळणारी कामे पूर्ण करण्याची धडपड सदस्यांकडून केली जात आहे. मात्र वेळेत नियोजन झाले नसल्याने सध्यातरी कुठेच कामाला सुरूवात झाली नाही. वित्त आयोगातील नववा टप्प्याच्या निधीबाबत ही अडचण आहे. (कार्यालय प्रतिनिधी)