शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

निधी आहे, पण मंजुरी नाही

By admin | Updated: October 19, 2015 00:20 IST

जिल्हा नियोजन समितीकडे स्वत:चा निधी उपलब्ध असतानाही त्यातील विकासाच्या कामांना गेल्या चार महिन्यांपासून मंजुरी दिली न गेल्याने शासकीय यंत्रणेत अस्वस्थता पहायला मिळते.

यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीकडे स्वत:चा निधी उपलब्ध असतानाही त्यातील विकासाच्या कामांना गेल्या चार महिन्यांपासून मंजुरी दिली न गेल्याने शासकीय यंत्रणेत अस्वस्थता पहायला मिळते. याच मुद्यावर २५ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेली ‘डीपीसी’ची बैठक गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहे.राज्यात भाजप-सेना युती शासन सत्तेत आल्यापासून विकास कामांच्या निधीची प्रचंड चणचण जाणवत असल्याचा अधिकाऱ्यांमधील सूर आहे. विकास कामांचे विविध विभागातील शेकडो कोटी रुपयांचे प्रस्ताव, अंदाजपत्रक तयार आहेत. अनेक कामांना प्रशासकीय मंजूरीही मिळाली आहे. मात्र या कामांसाठी शासनाकडून निधीच प्राप्त झालेला नाही. नवी कामे तर दूर कालव्यांच्या डागडुजीसाठीही पैसा नाही. तर दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीकडे स्वत:चा पैसा आहे. ‘डीपीसी फंड’ म्हणून त्याची ओळख आहे. मात्र त्यानंतरही गेल्या चार महिन्यांपासून डीपीसीच्या निधीतील विकास कामांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आलेली नाही. ही मंजूरी हेतुपुरस्सर तर थांबविली जात नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. निधी असताना गेल्या चार महिन्यांपासून शासनाच्या विविध विभागांना विकास कामासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या संथगतीने सुरू असलेल्या डीपीसीच्या कारभारावर राजकीयस्तरावरून आक्षेपही घेतला जात आहे. निधी असूनही मंजूरी थांबविण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. आता २५ आॅक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. या बैठकीत चार महिन्यांपासून रखडलेले विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. युती सरकारमध्ये विकास कामे होत नाहीत, जनतेचे प्रश्न सुटत नसल्याचा खुद्द अधिकारी वर्गातील सूर आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना निवडून आणणारे आणि त्यांच्यासाठी घरोघरी जाऊन मते मागणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही त्रस्त झाले आहेत. कारण त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सुचविलेल्या उमेदवाराला मते देणारी जनता आता या कार्यकर्त्यांनाच जाब विचारत आहे. निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या या कार्यकर्त्यांनाच आता लोकप्रतिनिधी दूर लोटत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. या कार्यकर्त्यांऐवजी ‘मार्जीन’ची कामे घेऊन येणारे कंत्राटदार या लोकप्रतिनिधींना जवळचे वाटत आहेत. त्यामुळे या सामान्य कार्यकर्त्यांची कोंडी झाली असून तोंड लपविण्याची वेळ आली आहे.