शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या इमारतीचे सहा कोटी पडून

By admin | Updated: July 14, 2016 02:36 IST

शहराच्या विकासात भर घालणारी पोलीस वसाहत आणि पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी वर्षभरापूर्वी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

नेतृत्वाचा अभाव : जुन्याच इमारतीत कारभार महागाव : शहराच्या विकासात भर घालणारी पोलीस वसाहत आणि पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी वर्षभरापूर्वी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही वर्ग करण्यात आले. मात्र जागेची समस्या आणि विकासाचय दृष्टीचा अभाव यामुळे वर्षभरापासून हा निधी तसाच पडून आहे. महागाव येथील पोलीस वसाहतीची मोठी समस्या आहे. पडक्या घरात पोलिसांना राहावे लागते. ही पडकी वसाहत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी दुरुस्तीच्या नावाखाली खर्चाचे कुरण बनले आहे. दुसरीकडे इंग्रजकालीन पोलीस ठाण्याची इमारतही खस्ताहाल झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या इमारतीची वयोमर्यादा संपल्याचे पत्र प्राप्त झाले होते. परंतु या पत्राची दखलच घेण्यात आली नाही. या पोलीस ठाण्याचे छत पावसाळ्यात गळते. छताचे तुकडे खाली पडतात. यावर उपाय म्हणून नवीन वसाहत आणि ठाण्याच्या इमारतीचा पर्याय पुढे आला. पोलीस महासंचालकांनी जानेवारी २०१५ मध्ये पोलीस निवासस्थानासाठी पाच कोटी २५ लाख ६५ हजार रुपये आणि ठाण्याच्या इमारतीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश ८ जानेवारी २०१५ रोजी पुसद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या खात्यात वर्ग केला. इमारत बांधण्यासाठी पैशाची अडचण नाही. परंतु पोलीस वसाहत आणि ठाण्याची इमारत व्हावी, यासाठी कुणीही पाठपुरावा केला नाही. इमारतीसाठी लागणारी जागा नगरपंचायत उपलब्ध करून देणार आहे. त्याची एनओसी आणि दुसरी पर्यायी जागा घ्यायची असेल तर जिल्हा परिषद अध्यक्षांना भेटून जागा उपलब्ध करून घेणे एवढेच काम शिल्लक आहे. परंतु तेही करायला कुणी पुढे येत नाही. (शहर प्रतिनिधी)