शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सांगा,काँग्रेस आमदार निवडून येणार कसे ?

By admin | Updated: June 14, 2014 23:50 IST

काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते अद्यापही सतरंजी उचलण्यापुरतेच मर्यादित आहेत, आमदारांच्या अवती-भोवती दलाल-कंत्राटदारांचा वावर कायम आहे, शासकीय यंत्रणेकडून क्षुल्लक कामासाठी सामान्य

कार्यकर्ते सतरंजीवरच : दलाल-कंत्राटदार अ‍ॅन्टी चेंबरमध्येयवतमाळ : काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते अद्यापही सतरंजी उचलण्यापुरतेच मर्यादित आहेत, आमदारांच्या अवती-भोवती दलाल-कंत्राटदारांचा वावर कायम आहे, शासकीय यंत्रणेकडून क्षुल्लक कामासाठी सामान्य नागरिकांची आर्थिक लूटमार सुरूच आहे, रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, वीज भारनियमन या जनतेच्या मूलभूत समस्याही गेल्या पाच वर्षात सुटू शकल्या नाहीत. ही सर्व विपरित परिस्थिती असताना जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार पुन्हा निवडून येणार कसे, हा सामान्य मतदारांचा प्रश्न आहे. आर्णीचे शिवाजीराव मोघे, राळेगावचे वसंत पुरके, वणीचे वामनराव कासावार, उमरखेडचे विजय खडसे, यवतमाळच्या नंदिनी पारवेकर हे काँग्रेसचे आमदार पुन्हा २०१४ ची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयारी करीत आहे. दिग्रस-दारव्हा या मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पूत्र राहुल ठाकरे नशीब आजमावणार आहेत. परंतु निवडणुकीला सामोरे जाताना या सर्वच नेत्यांच्या मनात हुरहूर आहे. लोकसभा निवडणुकीतील मतांच्या पिछाडीने ही भीती आणखी वाढविली आहे. गेल्या पाच वर्षात आपण जनतेची काय कामे केली, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ नेत्यांवर आली आहे. विधानसभेची २००९ ची निवडणूक ते २०१४ या पाच वर्षाच्या काँग्रेस आमदारांच्या कार्यकाळावर नजर टाकल्यास एकूणच जैसे थे स्थिती पहायला मिळते. सर्वाधिक वाईट अवस्था ही काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांची आहे. गावागावातील तंटामुक्त समित्या, विशेष कार्यकारी अधिकारी ही क्षुल्लक पदेही कार्यकर्त्यांच्या पदरी पडली नाहीत. या उलट स्थिती काँग्रेसच्या नेत्यांची आहे.