ऑनलाईन लोकमतदिग्रस : दारव्हा तालुक्यातील धामणगावदेव येथील आश्रमशाळेत शिक्षकाचा सहकारी शिक्षकानेच खून करून प्रेत पुरल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली. आरोपी शिक्षकाने स्वत:हून मानोरा पोलीस ठाणे गाठून या खुनाची कबुली दिली. प्रेत आपल्या शेतात पुरण्यात आल्याचे सांगितले. मृत शिक्षक दिग्रसचा रहिवासी असून तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता.इमरान अनू नवरंगाबादे (३४) रा. गवळीपुरा दिग्रस असे मृताचे नाव आहे. तर गोपाल गजाधरसिंग ठाकूर (३३) रा.नाईकनगर मानोरा असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. हे दोघेही दारव्हा तालुक्यातील धामणगावदेव येथील महात्मा मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळेवर गत १२ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. इमरान २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घरुन दारव्हा येथे जाण्यासाठी गेला होता. परंतु तो सायंकाळी परत आला नाही. पत्नीने त्याला रात्री ९ वाजता फोन केला. तेव्हा अर्ध्या तासात परत येतो असे सांगितले. मात्र तो परत आलाच नाही. दुसऱ्या दिवशी फोनही उचलला जात नव्हता. त्यानंतर वडिलांनी इमरान हरविल्याची दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.दरम्यान, बुधवारी सकाळी याच शाळेवरील शिक्षक गोपाल गजाधरसिंग ठाकूर हा थेट मानोरा पोलीस ठाण्यात पोहोचला. आपण सहकारी शिक्षकाचा खून केल्याचे सांगितले. तूर्तास गोपालने खुनाची कबुली दिली असली तरी कारण मात्र स्पष्ट केले नाही. मृत इमरानच्या मागे पत्नी, एक मुलगा, आई-वडील आहे.स्वत:च्याच शेतात पुरले प्रेतआरोपी गोपाल ठाकूर याने इमरानचे प्रेत आपल्या शेतात पुरुन ठेवल्याचीही कबुली पोलिसांपुढे दिली. पोलिसांनी त्याला घेऊन थेट दारव्हा-मानोरा मार्गावरील चिस्ताळा येथील शेत गाठले. त्या ठिकाणी शेतात विहिरीत बांधकामासाठी असलेल्या खड्ड्यात पुरलेले इमरानचे प्रेत आढळून आले. इमरान आणि गोपाल हे दोघे जीवलग मित्र होते, एकाच शाळेवर १२ वर्षांपासून कार्यरत होते. त्यामुळे खून कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहे.
शिक्षकाने केला सहकारी शिक्षकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 21:44 IST
दारव्हा तालुक्यातील धामणगावदेव येथील आश्रमशाळेत शिक्षकाचा सहकारी शिक्षकानेच खून करून प्रेत पुरल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली. आरोपी शिक्षकाने स्वत:हून मानोरा पोलीस ठाणे गाठून या खुनाची कबुली दिली
शिक्षकाने केला सहकारी शिक्षकाचा खून
ठळक मुद्देआत्मसमर्पण : मृत दिग्रसचा, आरोपी मानोºयाचा, शिक्षक दारव्ह्याच्या धामणगावदेवचे