शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावात तूर खरेदी १५ दिवसांपासून बंद

By admin | Updated: March 1, 2017 01:24 IST

येथील बाजार समितीच्या यार्डवर १५ फेब्रुवारीपासून नाफेडची शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली आहे.

 शेतकऱ्यांमध्ये चिंता : शेतमाल विकावा लागतोय व्यापाऱ्यांकडे राळेगाव : येथील बाजार समितीच्या यार्डवर १५ फेब्रुवारीपासून नाफेडची शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांना ३५०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल दराने व्यापाऱ्यांना तूर विक्री करावी लागत आहे. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. शासनाचा तूर खरेदीचा हमीभाव ५०५० रुपये आहे. नाफेडव्दारे त्याच दराने खरेदी केली जात आहे. हमी दरापेक्षा कमी दरात होत असल्याची खरेदी एकीकडे शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. तर दुसरीकडे कायद्याचे उल्लंघन करणारीही आहे. विविध संकटांनी आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याऐवजी त्यांची संकट वाढतच चालली आहे. बाजार समितीचे सचिव सुजीत चल्लावार यांनी नाफेडच्या यवतमाळ येथील अधिकाऱ्यांना तूर खरेदी संदर्भात विचारणा केली असता, यवतमाळ जिल्ह्यात सर्वच ठिकाणी नाफेडची तूर खरेदी बंद करण्यात आली आहे, ती परत सुरू करणे त्यांच्या अखत्यारीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांच्या या महत्वपूर्ण विषयावर वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करून तूर खरेदी त्वरित सुरू करावी यासाठी प्रयत्न करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. एकीकडे १५ मार्चपर्यंत ही तूर खरेदी सुरू ठेवण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत असताना, दुसरीकडे ही अव्यवस्था सुरू आहे. शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट होऊन परिस्थिती चिघळण्यापूर्वी नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तूर खरेदीसंदर्भात वास्तव भूमिका स्पष्ट करून दिलासा देण्याची व त्यांच्या होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षणाची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी) आर्णी बाजार समितीत २००० क्विंटल तूर विक्रीच्या प्रतीक्षेत पडून आर्णी : मागील १५ दिवसांपासून येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे जवळपास दोन हजार क्विंटल तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ओट्यावर पडून आहे. उन्हामुळे दररोज तुरीचे वजन घटत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. आर्णी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कमीशन घेणाऱ्या खरेदी-विक्री संघाने प्रयत्न करून शासकीय खरेदी केंद्र सुरू ठेवणे अपेक्षित होते. मात्र यापैकी कुणीही पुढाकार घेतला नाही. बाजार समितीच्या एका संचालकाने हलकी तूर रात्रीच मोजून दिल्याने खरेदीवर परिणाम झाल्याचे सांगितले जाते. (तालुका प्रतिनिधी)