शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नळ आले की शिट्टी वाजते..!

By admin | Updated: May 24, 2016 00:11 IST

आज सगळीकडे पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले आहे. याला आपणच जबाबदार आहोत.

पाणी वाचविण्यासाठी अभिनव शक्कलआर्णीच्या शाखा व्यवस्थापकाने शोधला उपायहरिओम बघेल आर्णीआज सगळीकडे पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले आहे. याला आपणच जबाबदार आहोत. पाण्याची बचत कशी करता येईल, याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अनेकदा गरज नसताना नळ सुरू राहतो. पाणी वाया जाते. आपल्या डोळ्यांना दिसूनही आपण नळ बंद करत नाही. ही बेफिकीरीच आज आपल्या अंगाशी आली आहे. अनेकदा नळाला पाणी कधी आले, कधी गेले, हे आपल्याला माहिती पडत नाही. त्यामुळे विनाकारण बहुमूल्य पाणी वाया जाते. ही परिस्थिती सर्वच गावांमध्ये आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असते. मात्र ही बाब रोखण्यासाठी आर्णीत अभिवन उपाय शोधण्यात आला आहे. आर्णी येथे गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची बिकट स्थिती आहे. नळ कधी येतील अन् कधी जातील याचा नेम राहिला नाही. वेळापत्रकच नाही. नळ आल्यानंतर नळाला लावलेले झाकन (कॅप) हवेच्या दाबाने फेकले जाऊन पाणी वाया जाते. त्यामुळे नळ कधीही येतील म्हणून महिला भर उन्हात ताटकळत उभे राहतात. ही बाब पाहून येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखेचे व्यवस्थापक पनिधर भावराव आत्राम अस्वस्थ झाले. यावर त्यांनी एक सोपा उपाय शोधून काढला. नळला बसविलेल्या कॅपला त्यांनी एक शिट्टी बसविली. नळ येताना सुरुवातीला पाईपमधून जी हवा बाहेर फेकली जाते, त्याद्वारे शिट्टी वाजू लागते. नळाला पाणी आले हे नागरिकांना तातडीने कळते आणि पाणी वाया जाण्याचा धोका टळतो. शिवाय, नळ कधी येणार म्हणून उन्हात उभे राहून वाट पाहण्याचीही गरज उरली नाही.शहरात आणि गावातही अनेकदा नळावाटे बरेच पाणी वाया जाते. नळ कधी आले हे कळत नसल्याने ही बाब घडते. मात्र नळाच्या कॅपला शिट्टी बसविल्याने आता आम्हाला नळ आला हे लगेच कळते. त्यामुळे पाणी वाया जात नाही.- पनिधर आत्राम, आर्णी