शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्तीसाठी पावले उचला

By admin | Updated: May 27, 2017 00:15 IST

कुपोषणामुळे महिला व बालके मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. ही बाब चिंताजनक आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विदर्भ प्रदेश विकास परिषद लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कुपोषणामुळे महिला व बालके मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. ही बाब चिंताजनक आहे. उपोषणमुक्तीसाठी त्वरित पावले उचला, अशी मागणी विदर्भ प्रदेश विकास परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. धारणी, चिखलधरा तालुक्यात ८०० पेक्षा अधिक बालकांचा मृत्यू कुपोषणाने झाला. अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांच्यात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागात विशेषत: नागपूर विभागात काही वस्त्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ५०० बालके कुपोषित आढळली. सप्टेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कुपोषणावर युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश राज्यसरकारला एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिले आहे. त्यादृष्टीने त्वरित पावले उचलली जावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कुपोषण रोखण्यासाठी संपूर्ण आदिवासी भागात युद्धस्तरावर शासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, आदिवासी क्षेत्रातील आरोग्य केंद्रावर बालरोग आणि महिलारोग तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करून त्यांना मुख्यालयाची सक्ती करावी, अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर माता आणि कुपोषित बालकांना सकस आहार आणि औषधांचे वाटप नियमित करावे, गरोदर माता आणि नवजात शिशुंसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा प्रचार, प्रसार आदिवासी बहुल भागात करण्यात यावा, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय घाडगे यांच्या नेतृत्त्वात डॉ. जीवन ठाकरे, कळंबचे नगराध्यक्ष दिगांबरराव मस्के, डॉ. रवींद्र कोटेचा, अशोक उमरतकर, बाभूळगाव तालुकाध्यक्ष राजकुमार पत्रे, कळंब तालुकाध्यक्ष ओमप्रकाश चांदुरकर, मुन्ना लाखिया, बसवेश्वर माहुलकर, गीता जळके, गजानन अजमिरे आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना निवेदन सादर केले.