शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिवटेच्या खुनाचा तपास जिल्ह्याबाहेर सोपवावा

By admin | Updated: August 29, 2016 01:00 IST

येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा कुख्यात प्रवीण दिवटे याच्या खुनाचा तपास जिल्ह्याबाहेरील पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवावा

कुटुंबीयांची पत्रपरिषद : यवतमाळच्या पोलिसांच्या प्रामाणिकतेवर संशययवतमाळ : येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा कुख्यात प्रवीण दिवटे याच्या खुनाचा तपास जिल्ह्याबाहेरील पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशी मागणी दिवटे कुटुंबियांनी रविवारी पत्रपरिषदेतून केली आहे. स्थानिक पोलीस दलातील एका अधिकाऱ्याच्या सापत्न वागणुकीमुळेच हत्या झाल्याचा आरोपही त्यांनी या पत्रपरिषदेत केला. यवतमाळातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे खुनातील आरोपींशी आर्थिक संबंध आहे. त्यांच्या सांगण्यावरून एका पोलीस उपनिरीक्षकाने प्रवीणच्या खासगी अंगरक्षकांना त्याच्यापासून दूर करण्याचे काम केले. कुठलेही कारण नसताना या अंगरक्षकांना यवतमाळातील नागपूर बायपासवर नेऊन बेदम मारहाण केली जात होती. प्रवीणपासून दूर रहा, असे सांगण्यात येत होते. हा धडाका २४ आॅगस्टपूर्वीपासूनच सुरू होता. आता अशाच अधिकाऱ्यांकडे खुनाच्या गुन्ह्याचा तपास असल्याने न्याय मिळणार नाही, असे प्रवीण दिवटे यांच्या कन्या सृष्टी व श्वेता यांनी पत्रपरिषदेत सांगितले. पोलीस राजकीय दबावात काम करीत आहे. यातूनच विरोधी टोळीला पुरक वातावरण तयार होईल, असे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहे. त्यांच्यातील सक्रिय गुन्हेगारांवर आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई पोलिसांकडून करण्यात आली नाही. याला केवळ स्थानिक अधिकाऱ्याचे गुन्हेगारांशी असलेले आर्थिक हितसंबंधच कारणीभूत असल्याचा आरोप सृष्टी दिवटे हिने केला. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोनचे मागील सहा महिन्यातील कॉल डिटेल्स काढल्यास हे स्पष्ट होईल. त्यामुळे आता अशा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तपास योग्य होणे शक्य नाही. प्रशासनाने इतर जिल्ह्यातील कोणत्याही अधिकाऱ्याकडे या खुनाचा तपास सोपवावा, अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे तिने सांगितले. पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नाव माहीत असलेल्याच आरोपींची नावे नमूद केली आहे. मात्र प्रत्यक्षात हल्ला करताना नाव माहीत नसलेले ओळखीचे चेहरेही होते. तशा संशयितांबाबत आपण पोलिसांकडे यादी दिली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी या आरोपींना ताब्यात घेतल्यास मी सहज ओळखू शकते, असे सृष्टी दिवटे हिने सांगितले. खुनाच्या घटनेनंतरच आठवडी बाजार, शारजा चौक, शनि मंदिर चौक येथे फटाके फोडण्यात आले. इतकेच नव्हे तर आठवडी बाजार परिसरातील जुन्या घरासमोर हातात तलवारी घेऊन काहींनी धुडगुसही घातल्याचे यावेळी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)आरोपींची गय नाही - राहुल मदने प्रवीण दिवटे खून प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडीही जप्त केली आहे. कायदेशीर कारवाई सुरू असून सर्व बाजूने तपास करुन गुन्हेगारांना गजाआड केले जाईल, कुणाचीही गय केली जाणार नाही, असे यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी सांगितले.