शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वतेज, श्रीतेज अन् शुभ्राला हवे हक्काचे आई-वडील

By admin | Updated: December 17, 2015 02:31 IST

कोणत्याही कुटुंबात मूल जन्माला येणे हा त्या कुटुंबासाठी अतिव आनंदाचा क्षण. मात्र काही अपरिहार्य कारणांनी हा आनंदाचा क्षण नकोसा वाटतो ...

चिमुकल्यांचा टाहो : सापडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांच्या शोधासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडपड यवतमाळ : कोणत्याही कुटुंबात मूल जन्माला येणे हा त्या कुटुंबासाठी अतिव आनंदाचा क्षण. मात्र काही अपरिहार्य कारणांनी हा आनंदाचा क्षण नकोसा वाटतो आणि मुलाला बेवारस सोडून दिले जाते. अशाच स्वतेज, श्रीतेज आणि शुभ्रा या तीन बालकांना आपल्या हक्काच्या आई-वडिलांची प्रतीक्षा आहे. यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्ष धडपडत आहे. दीड महिन्यांपूर्वी लाडखेड, घाटंजी आणि कळंब येथे अनुक्रमे स्वतेज, श्रीतेज आणि शुभ्रा ही तीन बालके बेवारस सोडून दिल्याचे आढळून आले. जन्म होताच या बालकांच्या नशिबी उपेक्षिताचे जीणे आले. काही कळायच्या आत त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आले. ७ नोव्हेंबर रोजी लाडखेड आणि घाटंजी परिसरातील एका शेतात पुरुष जातीचे बाळ स्वतेज आणि श्रीजेत आढळून आले, तर २६ सप्टेंबर रोजी कळंबच्या बसस्थानकावर शुभ्रा सापडली. संपूर्णपणे आईवर अवलंबून असलेल्या या चिमुकल्यांना त्यांची आई सोडून गेली. तीनही ठिकाणच्या पोलिसांनी शोधाशोध केली. परंतु थांगपत्ता लागला नाही. अखेर या बालकांना बालकल्याण समिती यवतमाळच्या आदेशाने संत गाडगे महाराज शिशुगृह वर्धा येथे दाखल करण्यात आले. शिशुगृहातील कर्मचारी या बालकांसाठी आई-वडिलांची भूमिका बजावत आहे. मात्र या तिघांनाही हक्काचे आई-वडील मिळावे म्हणून बालसंरक्षण समितीने पुढाकार घेतला आहे. ज्या कुणाला या बाबत माहिती असेल त्यांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रवी आडे यांनी केले आहे. आणखी एक महिना या बाळांच्या नातेवाईकांची वाट बघण्यात येईल. त्यानंतर बालकल्याण समितीच्या आदेशानुसार मुलांना दत्तक विधानाकरिता मुक्त घोषित करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)