शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

साहसी शिबिरांमध्ये झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:34 IST

साहसी उन्हाळी शिबिरांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यामध्ये मल्लखांब, रोप-वे, जिम्नॅस्टिक, ट्रेकिंग आणि स्केटिंगचा समावेश आहे. खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये साहस वाढावे, म्हणून शिबिरांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे.

ठळक मुद्देस्केटिंगसाठी तरुणांची फौज । मल्लखांब, रोप-वे आणि जिम्नॅस्टिकसह ट्रेकिंगवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : साहसी उन्हाळी शिबिरांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यामध्ये मल्लखांब, रोप-वे, जिम्नॅस्टिक, ट्रेकिंग आणि स्केटिंगचा समावेश आहे. खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये साहस वाढावे, म्हणून शिबिरांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. बदलत्या प्रवाहाचा धागा ओळखून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांना प्रतिसादही मिळत आहे.उन्हाळ्याचे दिवस सुटीचे आणि मौजमजेचे तर आहेच; यासोबतच कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रयत्न करण्याचेही आहे. स्पर्धेच्या युगात आपला मुलगा मागे पडू नये म्हणून प्रत्येक पालक काळजी घेतो. यातूनच उन्हाळी शिबिरांमध्ये गर्दी वाढत आहे. साहसी शिबिरांकडे सर्वाधिक कल आहे.जिल्हा क्रीडा विभागाने जयहिंद क्रीडा मंडळाच्या मदतीने उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. या ठिकाणी मल्लखांब शिकविला जात आहे. दुर्लक्षित झालेल्या या खेळाच्या पुनरुज्जीवनाचे काम केले जात आहे. उन्हाळी शिबिरात २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. याशिवाय खो-खो, कबड्डी, रोप-वेचे कौशल्य शिकविले जात आहे.मोबाईलपासून पिढी वाचवामुलांना साहसी खेळ खेळू द्या. म्हणजे त्यांचा समतोल विकास होईल. मात्र आजकालची मुले मोबाईलच्या नादात आहेत. त्यांना खेळ केवळ मोेबाईलमधलेच माहिती आहे. यामुळे त्यांचा विकास खुंटण्याची भीती आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. मुले उन्हाळी शिबिरात जरी नसली तरी, खेळासाठी त्यांना प्रोत्साहित करून मैदानावर नेण्याची नितांत गरज आहे.या मैदानांवर सुरू आहेत उन्हाळी क्रीडा शिबिरस्थानिक नंदूरकर विद्यालयात अनेक वर्षांपासून स्केटिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे. येथे स्केटिंग शिकणाºया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेन्दिवस वाढत आहे. नेहरू स्टेडियमवर जिम्नॅस्टिकचा प्रकारही शिकविला जातो. यासह विवेकानंद विद्यालयाच्या मैदान, पळसवाडी कॅम्प, पिंपळगाव बायपाससह शहरातील विविध भागात उन्हाळी क्रीडा शिबिरे घेतली जात आहे.