शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या खुनात संशयित ताब्यात

By admin | Updated: May 30, 2017 01:16 IST

स्थानिक सूरजनगरातील महिलेच्या खुनामागे वेगळीच मिस्ट्री असल्याचा संशय पोलिसांना आहे.

तांत्रिक बाजूने तपास : पोटावर चाकूचे दहा वारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक सूरजनगरातील महिलेच्या खुनामागे वेगळीच मिस्ट्री असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने तपास सुरू असून एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावर मिळालेले दोन मोबाईल या तपासाची दिशा ठरत आहे. त्यावरूनच आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. विविध पथकाने माहिती गोळा करणे सुरू केले आहे. पपिता निलध्वज कांबळे (३९) या महिलेचा तिच्या घरातच खून करण्यात आला. तिच्या पोटावर चाकूने तब्बल दहा वार करण्यात आले. त्यानंतर गळा कापण्याचा प्रयत्न केला. नंतर डोक्यावर जड वस्तूने प्रहार करण्यात आला. शिवाय या महिलेचे ओठही अर्ध्यापेक्षा जास्त फाटलेले होते. अतिशय क्रूरपद्धतीने हा खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. घटनास्थळावरील काही परिस्थितीजन्य पुराव्यावरून या प्रकरणाला वेगळेच वळण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उपविभागीय अधिकारी पीयूष जगताप यांनी हा तपास हातात घेतला असून विविध पथकाच्या माध्यमातून संशयास्पद ठिकाणी आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान रात्री एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्याच्याकडून खुनासंदर्भात कुठलीही माहिती वृत्तलिहिपर्यंत मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. हा खून नेमका कुणी व का केला यावर लक्ष केंद्रीत केले आहे. एकंदरच महिलेच्या खुनाची मिस्ट्री पोलिसांपुढेही आव्हानात्मक आहे. मात्र दोन दिवसात या घटनेचा संपूर्ण उलगडा होईल, असाही विश्वास पोलीस यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे.