शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दैवतांना निरोप देताना प्रदूषणाला पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

नुकतेच घरोघरी गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन केले गेले. महालक्ष्मी गौरीचे मोठ्या प्रमाणात पूजन करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली गेली. महाप्रसादाचे कार्यक्रम झाल्यावर वापरलेले प्लास्टिक, थर्माकोलचे द्रोण पत्रावळी मात्र स्वच्छ वाहत्या पाण्यात टाकून दिले.

ठळक मुद्देसंडे अँकर । जलस्त्रोतांमध्ये कचरा, यवतमाळ नगर पालिकेची यंत्रणा करतेय स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गणेशोत्सवाचे दहा दिवस मोठ्या जल्लोषात साजरे झाले. विसर्जनही तेवढ्याच उत्साहात पार पडले. मात्र विसर्जनानंतर गणरायाच्या मूर्तींची अवस्था काय, असा प्रश्न निर्माण व्हावा, असे चित्र शहरानजीकच्या विविध जलस्त्रोतांमध्ये सध्या दिसत आहे. भाविकांनी पाण्यात सोडलेल्या मूर्ती दोन दिवसानंतरही विसर्जित होण्याचीच वाट पाहात आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या यंत्रणेलाच त्यांची व्यवस्था करावी लागत आहे.मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या सामान्य नागरिकांनाच हे विचित्र चित्र आढळले, हे विशेष. त्यांनी याबाबत खंतही व्यक्त केली. ते म्हणाले, सध्याचे दिवस हे सणावारांचे आहेत. नुकतेच घरोघरी गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन केले गेले. महालक्ष्मी गौरीचे मोठ्या प्रमाणात पूजन करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली गेली. महाप्रसादाचे कार्यक्रम झाल्यावर वापरलेले प्लास्टिक, थर्माकोलचे द्रोण पत्रावळी मात्र स्वच्छ वाहत्या पाण्यात टाकून दिले. तेलकट असणारे हे नष्ट न होणारे द्रोण -पत्रावळी पुढे अनेक वर्ष पर्यावरणाचे नुकसान करत राहणार आहे. पाण्यात राहणारे जीव या तेलाच्या तवंगाने आणि द्रोण पत्रावळीच्या कचऱ्याने गुदमरून जाणार आहेत.घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी विराजमान झालेल्या गणरायाला आम्ही ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे आर्जव करीत नुकताच निरोप दिला. ढोल ताशांच्या, भजनांच्या गजरात गणराया विसर्जित झाले. आम्ही फार मोठे धार्मिक कार्य संपन्न झाल्याच्या भावनेने कृतकृत्य झालो. आजकाल आमचे लाडके बाप्पा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमधून विराजमान होऊन आमच्याकडे येतात. आम्हाला गणपती बाप्पाला विराजमान तर करायचे असते, पण महाग नको म्हणून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमधील बाप्पांना घातक रंगासहीत आम्ही विराजमान करतो.दहा दिवस अगदीच मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर आम्हाला लगबग असते ती बाप्पांना विसर्जित करण्याची. गणरायांना आम्ही सार्वजनिक अथवा नैसर्गिक स्वच्छ जलस्रोतांमध्ये भक्तिभावाने विसर्जित करतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रासायनिक रंगांमुळे गणराया प्रत्यक्षात विसर्जित होतच नाहीत. आम्ही मात्र बाप्पांचे विसर्जन झालेय या पूज्य भावनेने घरी जाऊन प्रसादाचे वाटप करतो. इकडे आमचे लाडके बाप्पा मात्र पाण्यात इतस्तत: पडून विसर्जित होण्याची वाट पाहत आहेत.एरवी प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत काहीच करीत नाहीत असे ओरडणारे आम्ही सर्वत्र प्रदूषण करीत असतो. स्थानिक प्रशासन मात्र विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून उपलब्ध मानव यंत्रणेला सोबत घेऊन जलस्रोत स्वच्छ करण्यासाठी आणि आमच्या आराध्य गणरायाची विटंबना रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. दैवतांचे देवत्व आणि पर्यावरणाचे संरक्षण हेसुद्धा धार्मिक कार्यच आहे. धर्माचे पालन उन्मादाने नव्हे तर उन्मेषाने केले पाहिजे.- मिलिंद देशपांडेशिक्षक (यवतमाळ)

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन