शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हातही मशागतीला आला वेग

By admin | Updated: May 26, 2017 01:19 IST

तालुक्यात भर उन्हात चटके सहन करत बळीराजा पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेगाने लागला आहे.

मान्सूनचे संकेत : बहुतांश शेतकऱ्यांचा कल यांत्रिक मशागतीकडेलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यात भर उन्हात चटके सहन करत बळीराजा पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेगाने लागला आहे. यंदा मान्सून वेळेपूर्वीच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असून वेगाने मशागतीच्या कामाला लागले आहे.वर्ष कसेही निघो बळीराजाकडे शेतीची मशागत करणे, बीज रोवणे, त्याचे संगोपन करणे ही कामे नित्याने करावी लागतात. हे पेरणी चक्रात शेतकरी पुरता घुटमळून जातो. अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करून हातात आलेल्या पिकावर समाधान मानत असतो. ऊन, वारा, पाऊस, हिवाळ्याची थंडी शेताच्या बांधावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यात शेतकरी धन्यता मानतो. चंद्राच्या उजेडात रात्रीची जागरण करून वन्यप्राण्यापासून तावडीतून पिकाची जोपासणा करावी लागते. रात्रपाळीतही पिकांना पाणी देणे ही कामे शेतकरी करीत राहतो. सध्या खरिपातील कपाशीची झाडे काढणे सुरू असून सधन शेतकरी ट्रॅक्टरच्या मदतीनेही मशागत करीत आहेत. या पऱ्हाट्या शेतकरी व शेतमजूर सरपणासाठी गोळा करतात. बैलजोडीच्या वाढत्या किमतीमुळे अनेक शेतकऱ्याजवळ बैलजोडी राहिलेली नाही. शिवाय मजुरांकडून कामे करण्यास वेळही लागतो व कामेही लवकर होत नसल्याने रान मोकळे करण्यासाठी व मशागतीची कामे त्वरित उरकण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच ही कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहे. चालू वर्षाच्या मालाच्या भावावर ठरते पुढील नियोजन, शेतकरी पुढील हंगामाचे नियोजन सध्या मिळत असलेल्या शेतमालाच्या दरावर ठरवत असतो. गतवर्षी तुरीला आठ हजार रुपये भाव मिळाल्याने खरीपात तुरीचा पेरा वाढला होता. यंदा मात्र तुरीला साडेतीन ते साडेचार हजार पर्यंत आहे. तर शासकीय खरेदीत अनेक अडचणीचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे. असे असले तरी सध्या रखरखत्या उन्हात शेतकरी आपले शेत मोकळे करून पेरणीयोग्य बनवण्यात गुंतला आहे. दुष्काळाचे दृष्टचक्र भेदून पुन्हा नव्या जोमाने व गतवर्षीसारखा चांगला पाऊस होवू दे या आशेने शेतकरी शेतकरी मशागतीस जुंपला असल्याचे दिसत आहे. सर्व शेतकऱ्यांना आस लागली आहेत ती समाधानकारक पावसाची.