शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

उपअभियंत्याचा निवडणूक कर्तव्यावर दारूच्या नशेत गोंधळ

By विशाल सोनटक्के | Updated: April 18, 2024 21:03 IST

उमरखेड येथील घटना : गुन्हा नोंदवून पोलिसांनी केली अटक

यवतमाळ: निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याने दारूच्या नशेमध्ये धिंगाणा घातला. ही घटना उमरखेड येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सखाराम मुळे यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी माधव उघडे (वय ५०) यांना ताब्यात घेतले आहे. ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव येथे कार्यरत आहेत.ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यंत्र मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाणाऱ्या साहित्याची सिलिंग करून मॉकपोल घेणे व तयार केलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राच्या नोंदी ठेवण्याचे काम तहसील कार्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदाम क्रमांक २ येथे सुरू असताना उपअभियंता माधव गोविंद उघडे यांनी दारूच्या गोंधळ घातला. या घटनेची नोंद उपविभागीय अधिकारी डॉ. मुळे यांनी तत्काळ घेतली. या प्रकरणी नायब तहसीलदार वैभव विठ्ठल पवार यांनी उमरखेड पोलिसांमध्ये दिली. त्यावरून उमरखेड पोलिसांनी माधव उघडे यांच्याविरुद्ध कलम १३४ लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ व कलम ८५ दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.निवडणूक संबंधाने टेबल क्रमांक २७ वर काम करण्याचे निर्देश उघडे यांना दिले असता त्यांनी काम करण्यास नकार दिला. नंतर निवडणूक प्रक्रियेचे काम सुरू केले असता, त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र चुकीच्या पद्धतीने सिलिंग केली. टेबलवरील त्यांचे सहकारी कर्मचारी तलाठी पंजाबराव सानप यांनी ही बाब वरिष्ठांच्या निर्दशनास आणून दिली. त्यावर या कामात दुरुस्ती करण्यास सांगितले असता, त्यास नकार देत उघडे यांनी गोंधळ घातल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, मद्यपानाच्या अनुषंगाने कुटीर रुग्णालय उमरखेड येथे तपासणी करण्यात आली असून, हे नमुने न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ