शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावातून विद्यार्थिनीचे अपहरण

By admin | Updated: May 31, 2017 00:24 IST

राळेगाव येथील नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अद्यापही थांगपत्ता नाही : आईने वेषांतर करून एकाला पकडले लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राळेगाव येथील नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हाही नोंदविला. दरम्यान घरच्या मोबाईलवर संपर्क करून भेटीसाठी बोलाविणाऱ्या युवकाला अपहृत मुलीच्या आईने यवतमाळ बसस्थानकावर सोमवारी दुपारी वेषांतर करून पकडले. मात्र अजूनही मुलीचा थांगपत्ता लागला नाही. २२ मेच्या रात्री ११ वाजतापासून ही विद्यार्थिनी बेपत्ता झाली. कुटुंबियांनी नातेवाईकांकडे शोध घेऊनही न सापडल्याने अखेर २४ मे रोजी राळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि ३६३ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला. सदर विद्यार्थिनीच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले असून आई रोजमजुरी करून मुलांचे पालन पोषण करते. अशातच २२ मेच्या रात्रीपासून सदर विद्यार्थिनी बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेऊनही तिचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान तिच्या घरच्या मोबाईल क्रमांकावर यवतमाळातील एका युवकाने संपर्क केला. विद्यार्थिनीच्या आईने संवाद साधला. मात्र तिला ती विद्यार्थिनी समजून त्या युवकाने यवतमाळच्या बसस्थानकावर भेटण्यासाठी बोलविले. आईनेही शक्कल लढवून मुलीचा वेष धारण केला, तोंडाला रुमाल बांधून ती बसस्थानकावर पोहोचली. तत्पूर्वी या सापळ्याबाबत पोलिसांना सूचित करण्यात आल्याने पोलीस कर्मचारीही तेथे हजर होते. तो युवक समोरासमोर येताच त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याने सुरुवातीला आपले नाव महेश असे सांगितले. मात्र पोलिसांच्या प्रसादानंतर त्याची ओळख पटली. महादेव असे या मुलाचे नाव आहे. तो राळेगावातील एका ढाब्यावर काम करतो. त्याला सदर विद्यार्थिनीच्या घरचा नंबर कसा मिळाला, याची चौकशी पोलिसांनी केली असता त्याने ढाब्यावर काम करणाऱ्या मारोती नामक सहकाऱ्याचे व त्याची पत्नी काजल हिचे नाव उघड केले. त्यांनी आपल्याला या विद्यार्थिनीच्या घरचा मोबाईल नंबर दिला, तिला वडील नसल्याची माहिती दिली, त्यामुळे आपण गेल्या अनेक महिन्यांपासून या विद्यार्थिनीवर नजर ठेऊन होतो, असे त्याने पोलिसांना सांगितल्याचे विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र विद्यार्थिनीच्या अपहरणाशी आपला संबंध नसल्याचे तो म्हणाला. रॅकेट तर सक्रिय नाही ? मोबाईलवर संपर्क करणारा हा युवक भेटला असला तरी विद्यार्थिनीचा आठवडा लोटूनही अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. राळेगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. राळेगावात गोरगरीब मुलींना टार्गेट बनविणारे एखादे रॅकेट तर सक्रिय नाही ना?, अशी शंका सदर विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. आपल्या अपहृत मुलीचा पोलिसांनी शोध घ्यावा, यासाठी तिचे कुटुंबीय जिल्हा पोलीस अधीक्षक व महानिरीक्षकांनाही प्रत्यक्ष भेटून साकडे घालणार असल्याचे सांगण्यात आले.