शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’च्या महिला वाहकांना नऊही महिन्यांची पगारी रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 16:50 IST

कामाचा वाढता ताण, खडतर रस्त्यावरून दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) महिला वाहकांच्या गर्भपाताचे प्रमाण वाढल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. महिला वाहकांचे मातृत्व हिरावले जाऊ नये, या भावनेतून त्यांच्या प्रसूती रजेमध्ये तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता पूर्ण नऊ महिने पगारी रजा उपभोगता येणार आहे.

ठळक मुद्दे कामाचा ताण व खराब रस्त्यामुळे गर्भपात वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कामाचा वाढता ताण, खडतर रस्त्यावरून दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) महिला वाहकांच्या गर्भपाताचे प्रमाण वाढल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. महिला वाहकांचे मातृत्व हिरावले जाऊ नये, या भावनेतून त्यांच्या प्रसूती रजेमध्ये तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता पूर्ण नऊ महिने पगारी रजा उपभोगता येणार आहे.महिला वाहकांना सहा महिने प्रसूती रजा दिली जात होती. गरज भासल्यास अतिरिक्त सुटी घ्यावी लागत होती. मात्र या सुटीचे वेतन मिळत नव्हते. बिनपगारी झाल्याने निर्माण होणाºया आर्थिक प्रश्नांच्या भितीतून त्यांना कामावर जावे लागत होते. चाळण झालेल्या रस्त्यावरून धक्के खात होणारा प्रवास, दगदग यामुळे काही महिला वाहकांचा तर दोन वेळा गर्भपात झालेला आहे. हा प्रश्न गंभीर होत चालल्याने गर्भवती महिला कामगारांना काही महिन्यांपूर्वी ‘टेबल वर्क’ देण्यात आले होते. प्रसूती काळात दिल्या जाणाºया रजा वाढविण्यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या चार सदस्यिय समितीने दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय महामंडळाने घेतला होता. आता सुटीचा कालावधी नऊ महिने करण्यात आला आहे.सहा महिने मिळणारी रजा कधी घ्यायची याचा निर्णय महिला कामगारांचा असतो. बहुतांश महिला जन्मानंतर बाळाच्या संगोपनासाठी या रजेचा वापर करतात. काही बाबतीत वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्यानुसार प्रसूतिपूर्व संपूर्ण विश्रांतीची गरज निर्माण झाल्यास अतिरिक्त रजा घेतली जाते. महामंडळात अतिरिक्त रजेचे वेतन मिळत नाही. हीच बाब त्यांच्या गर्भपाताला कारणीभूत ठरत असल्याने तीन महिने पगारी रजा देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. भविष्यात ज्या महिला कामगारांना अशा रजेची आवश्यकता भासेल त्यांना याचा लाभ मिळणार आहे.मातृत्वाचा योग्य सन्मानपरिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेत झालेल्या एसटी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठकीत तीन महिने अतिरिक्त पगारी रजेचा निर्णय घेण्यात आला. स्त्रीचे मातृत्व हे तिच्यासाठी मांगल्याची घटना आहे. तिच्या मातृत्वाचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे, तिचे मातृत्व कोणत्याही स्वरूपात हिरावून घेतले जाता कामा नये या भावनेतून एसटीच्या महिला कर्मचाºयांसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ‘एसटी’ने म्हटले आहे.