शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्प्रिंकलर, ड्रिपचे शेकडो प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: August 13, 2014 00:01 IST

तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात स्प्रिंकलर व ड्रिपच्या शेकडो केसेस प्रलंबित आहेत. ह्या केसेस लवकर निकाली काढून जिल्हा स्तरावर पाठविल्या जात नसल्याने

दारव्हा : तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात स्प्रिंकलर व ड्रिपच्या शेकडो केसेस प्रलंबित आहेत. ह्या केसेस लवकर निकाली काढून जिल्हा स्तरावर पाठविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. अधिकाऱ्यांच्या दप्तरदिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. नवनवीन तंत्राचा वापर करून शेती उत्पादनात भर पडावी यासाठी शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. स्प्रिंकलर, ड्रिप सारखी सिंचनाची साधने ७५ टक्के अनुदानावर उपलब्ध करून देणे हा याच योजनेचा भाग आहे. परंतु शासन स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी शेतकऱ्यांना वेळेवर या योजनांचा लाभ मिळत नाही, परिणामत: शासनाचा हेतू साध्य होत नाही. शेतकरी संपूर्ण कागदपत्रे व रक्कम देऊन डिलरकडून स्प्रिंकलर, ड्रिप घेऊन जातो. त्यानंतर डिलर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रकरण सादर करतो. तालुका व उपविभागीय कार्यालयाकडून हे प्रकरण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आठवडाभरात पोहोचायला पाहिजे परंतु सहा-सहा महिन्यांपासून ही अनुदानाची प्रकरणे याच कार्यालयात पडलेली दिसतात. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सध्या स्प्रिंकलरची चारशे व ड्रिपची पंधरा प्रकरणे तर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात साडेतीनशे केसेस पेंडिंग असल्याचे सांगण्यात आले. याची कारणे विचारली असता फंड नसल्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळते. तर दुसरीकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने पंधरा दिवसांपूर्वी दोन कोटी रुपये अनुदानाचे धनादेश काढल्याची माहिती दिली. यावरून दारव्हा तालुक्यातील अनुदानाच्या रकमेचे धनादेश ही प्रकरणे यवतमाळला वेळेत न पाठविल्याने निघू शकले नाही, ही बाब स्पष्ट होते. यावर्षी आधीच निसर्ग कोपल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच स्प्रिंकलर, ड्रिपच्या योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने सिंचनाची चांगली सुविधा असणाऱ्या या योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे दिसून येते. कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.(शहर प्रतिनिधी)