शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

फवारणी उलटतेय शेतकºयांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:00 IST

किडींच्या नियंत्रणासाठी अतिजहाल विषाची फवारणी आता शेतकरी आणि मजुरांच्या जीवावर उलटत आहे.

ठळक मुद्देतिघांचा मृत्यू : २२८ जणांना विषबाधा

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : किडींच्या नियंत्रणासाठी अतिजहाल विषाची फवारणी आता शेतकरी आणि मजुरांच्या जीवावर उलटत आहे. तीन महिन्यात तिघांचा मृत्यू झाला तर २२८ जणांना विषबाधा झाली. ही आकडेवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची असून खासगी रुग्णालयातही अनेकांनी उपचार घेतल्याने हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.गत काही वर्षांपासून कपाशी आणि सोयाबीनवर किडींचे मोठ्या प्रमाणात आक्रमण होते. यामुळे संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकरी ना-ना उपाय योजतात. त्यातील प्रभावी उपाय म्हणजे कीटकनाशकांची फवारणी होय. पीक वाचविण्यासाठी अतिप्रवाही कीटकनाशकांची शेतकºयांकडून फवारणी केली जाते. परंतु फवारणी करताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब होत नसल्याने शेतकºयांच्या जीवावर बेतत आहे. जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात तब्बल २२८ शेतकºयांना फवारणीतून विषबाधा झाल्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोंद आहे. यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अनेक शेतकºयांनी खासगी रुग्णालयात आणि गावाजवळील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आहे. जुलै महिन्यात १६ शेतकरी तर आॅगस्टमध्ये तब्बल १२९ शेतकºयांना विषबाधा झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक ८३ शेतकरी विषबाधेच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे. किडींचा प्रादूर्भाव वाढताच विषबाधेच्या संख्येतही वाढ झाली आहे. दरदिवशी तब्बल आठ ते दहा शेतकरी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत.फवारणी करताना अनेकदा शेतकरी आणि मजूर योग्य काळजी घेत नाही. बरेचदा हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी केली जाते. पंपाचे नोझल दूर धरले जात नाही. फवारणी करताना विषाचे मिश्रण अंगावर पडते. त्यामुळे कपडे ओले होऊन घामाद्वारे विषाचा संसर्ग शरीरात होतो. परिणामी विषबाधा होते. फवारणी करताना कोणताही मजूर तोंडाला मास्क बांधत नाही. अनेकदा तंबाखू व इतर पदार्थही हात न धुताच खाल्ले जातात. त्यातूनही विषबाधेचे प्रमाण वाढते. अनेकदा डोळ्यात विष उडून डोळे निकामी होण्याचीही भीती असते. यामुळे शेतकरी आणि शेतमजुरात भीतीचे वातावरण आहे.फवारणी करताना डोळे निकामीगुंज : महागाव तालुक्यातील हिवरदरी येथील शेतकºयाच्या डोळ्यात फवारणी करताना विष गेल्याने दोनही डोळे गमावण्याची वेळ आली आहे. रमेश पवार असे या शेतकºयाचे नाव आहे. कपाशीवर कीटकनाशकाची फवारणी केली. हवेच्या झोताने कीटकनाशक डोळ्यात गेले. त्याला पुसदच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचे दोनही डोळे निकामी झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडे तीन एकर शेती असून संपूर्ण कुटुंबच त्याच्यावर अवलंबून आहे.‘स्टीकर’ ठरतेय घातक४कीड नियंत्रणासाठी कीटकनाशक अधिक काळ झाडावर टिकून रहावे म्हणून स्टीकरचे मिश्रण कीटकनाशकासोबत फवारले जाते. स्टीकरमुळे विष झाडावर अधिक काळ टिकून राहते. तसेच विशिष्ट प्रमाणात पसरतही जाते. मात्र हेच स्टीकर शेतकºयांनी घातक ठरत आहे. कीटकनाशक आणि स्टीकरचे मिश्रण फवारणी करताना विषाचे थेंब हातावर पडतात. स्टीकर मिसळलेले असल्याने शरीरावर पसरुन त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो. हात धुतल्यानंतरही ते निघत नाही. यातूनच विषबाधा होते.सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्वचेतून विषबाधा झालेले रुग्ण दाखल होत आहे. फवारणी करताना योग्य काळजी घेण्याची गरज आहे. फवारणीच्या काळात कोणत्याही वस्तूचे सेवन करू नये. पिण्याच्या पाण्याचे भांडे वेगळे ठेवावे. कीटकनाशकाचे मिश्रण करताना हॅन्डग्लोज वापरावे. त्यामुळे विषबाधेचे प्रमाण कमी होते.- डॉ.बाबा येलकेविभाग प्रमुख (मेडिसीन) मेडिकल कॉलेज, यवतमाळ