शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात भुईमूग काढणीला वेग

By admin | Updated: May 27, 2017 00:18 IST

तालुक्यात सध्या उन्हाळी भुईमूग काढणीची कामे वेगाने सुरू आहेत. यावर्षी उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : तालुक्यात सध्या उन्हाळी भुईमूग काढणीची कामे वेगाने सुरू आहेत. यावर्षी उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे. मागील वर्षी एकरी दहा क्विंटल प्रमाणे उत्पादन झाले होते. यावर्षी मात्र चार क्विंटलचा उतारा येत असल्याचे शेतकरी सांगत आहे. तालुक्यात अनेक शेतकरी उन्हाळी भुईमूग पिकाची लागवड करतात. दरवर्षी यातून त्यांना चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे खरिपाच्या हंगामासाठी मोठी मदत होते. भुईमूगाला भावदेखील दरवर्षी चांगला मिळतो. यावर्षी मात्र उत्पन्न कमी झाले असून याला भावसुद्धा चांगला मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. अनेकांची तर भुईमूग लागवडीसाठी लागलेला खर्च आणि मजुरीदेखील निघत नसल्याने ते अडचणीत सापडले आहे. तालुक्यात निंबी, पार्डी, भोजला, जांबबाजार, वालतूर रेल्वे, वन कारला, मोखाड, चिखली कॅम्प, मरसूळ, वालतूर तांबडे, वरूड, नंदपूर, मोहा, आरेगाव, काटखेडा, हुडी, हेगडी, कार्ला, माणिकडोह, बोरगडी, शेलू, बोरी, सांडवा, मांडवा, हर्षी, गौळ, चिलवाडी, पोखरी या गावांसह इतर गावांमध्ये भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी शेतात भुईमूगाचे पीक सुरुवातीला चांगले दिसत असले तरी प्रत्यक्षात आता मात्र उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे येत्या हंगामात पेरणीसाठी लागणारा खर्च कसा उभारावा, याची काळजी शेतकऱ्यांना लागली आहे. भुईमूग हे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे शेतकरी त्याची लागवड करतात. एकरी २५ ते २० हजार रुपये या पिकाला लागवड खर्च येतो. दोन ते तीन विहिरींचे पाणी एकत्रित करून त्याची निगा राखल्या जाते. तसेच या भागात असलेल्या वन्यप्राण्यांच्या लागवडीतून त्याची काळजी घ्यावी लागते. एवढे करूनसुद्धा त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी निसर्गाने आवश्यक ती साथ न दिल्याने शेतकऱ्यांचा भुईमूग पिकापासूनही अपेक्षाभंग झाला आहे.