शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 24, 2014 23:47 IST

यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जमिनीत ओलावा कमी झाला आहे़ त्यामुळे उष्ण वातावरणामुळे कापूस, सोयाबीन या पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़

नांदेपेरा : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जमिनीत ओलावा कमी झाला आहे़ त्यामुळे उष्ण वातावरणामुळे कापूस, सोयाबीन या पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़ कपाशीवर दुधाळ, पांढरी माशी, मर्ग यांनी आक्रमण केले आहे. कपाशीवर रोग आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे़ शिवाय पावसाअभावी सोयाबीन हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ अगोदरच शेतकरी दुबार-तिबार पेरण्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या जवळील पैसा खर्च झाला आहे. परिणामी या रोगांना नियंत्रण आणण्याकरिता किटकनाशके कसे खरेदी करावे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.कपाशी, सोयाबिनला जगविण्यासाठी किटकनाशके खरेदी करावे, की पोळा सण साजरा करावा, अशा विवंचनेत शेतकरी भरडले जात आहे. तरीही सणासाठी जमा केलेले पैसे शेतकरी किटकनाशक खरेदीसाठी वापरत आहे़ यामुळे शेतकऱ्यांचा महत्वाचा सण यावर्षी कोरडाच जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे़ पिकांचे रोगांपासून संरक्षण कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली जाते. पर्यायी पीक म्हणून कपाशीसोबत सोयाबीनचीही लागवड केली जाते. सोयाबिनचे पीक दिवाळी साजरी करण्यासाठी उपयोगी पडते, असा शेतकऱ्यांचा समज आहे़ परंतु यावर्षी अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाला अजूनपर्यंत फुलेसुध्दा लागली नाही़ त्यामुळे अळीने आक्रमण केले असून झाडे रिकामी होत आहे़ काही शेतांतील सोयाबीन पूर्णत: नष्ट झाले आहे़ कृषी विभागामार्फत अनुदानावर कोणत्याही प्रकारचे किटकनाशक पुरविले जात नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या धोरणाविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे़ शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नही उभा ठाकला आहे़ पाऊस आज ना उद्या पडेल, या आशेने शेतकरी चातकासारखे आकाशाकडे टक लावून पावसाच्या प्रतीक्षेत आहे़ परंतु बळीराजा संकटात असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन सुस्तच असल्याचे दिसून येत आहे़ कृषीप्रधान देशात शेतकरी संकटात असताना कोणत्याही सामाजिक संस्थाही त्यांना आर्थिक मदत देण्यास समोर येताना दिसून येत नाही़ शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने बाजारपेठही थंडावल्या आहे़ (वार्ताहर)