शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मृगाच्या पावसाने पेरणी सुरू

By admin | Updated: June 12, 2017 02:03 IST

बहुप्रतीक्षित मृग नक्षत्राच्या जलधारांनी धरतीला चिंब भिजविले आणि शेतकरी पेरणीच्या कामाला लागला.

मान्सूनची प्रतीक्षा : पुसदमध्ये दोन दिवसांत ७१ मिमी, महागावातही हजेरी लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव/उमरखेड : बहुप्रतीक्षित मृग नक्षत्राच्या जलधारांनी धरतीला चिंब भिजविले आणि शेतकरी पेरणीच्या कामाला लागला. महागाव आणि उमरखेड तालुक्यात दोन दिवसात समाधानकारक पाऊस कोसळल्याने शेतकरी शेतशिवारात पेरणी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याने विदर्भात मान्सूनच्या जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.गत काही वर्षांपासून दुष्काळ आणि नापिकीने शेतकरी त्रस्त झाला आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी आनंदीत झाला. त्यातच केरळ मार्गे मान्सून कोकण किनारपट्टीत दाखल झाला. लवकरच विदर्भातही दमदार पावसाला प्रारंभ होण्याची चिन्हे आहे. अशातच गत गुरुवारपासून पुसद, महागाव, उमरखेड, दिग्रस तालुक्यात मृगनक्षत्राचा पाऊस बरसला. या आशादायक पावसाने शेतात पेरणीची कामे सुरू झाली. बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी शेतात कपाशीसाठी फुल्या पाडण्याचे काम सुरू केले आहे. महागाव तालुक्यात तर बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीच्या टोबणीलाही प्रारंभ केला आहे. शेतशिवारात लगबग वाढली असून दमदार पावसाकडे शेतकऱ्यांची नजर लागल्याचे दिसत आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासापुसद : तालुक्यात गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर शुक्रवारी रात्रीही पाऊस झाला. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त पुसदकरांना काहीसा दिलासा मिळाला. दोन दिवसात ७१ मिमी पावसाची नोंद झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची तेवढी प्रतीक्षा आहे. गरुवारी मृग नक्षत्राच्या दिवशी रात्री उशिरा तीन तास जारेदार पाऊस झाला. गुरूवारी ५५ मिमी पाऊस झाला तर शुक्रवारी रात्री ८.३० वाजता पावसाला सुरूवात झाली आणि दोन तास पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. १६ मीमि एवढा पाऊस झाला. दोन दिवसात ७१ मिमी पावसाची नोंद तालुक्यात झाली.