शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वानंदाच्या कार्यातूनच समाजसेवा घडते

By admin | Updated: August 13, 2014 00:00 IST

इतरांना उपकृत करण्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी केलेल्या कार्यातून नकळत समाजसेवा घडते. त्यासाठी प्राणिमात्रांवर प्रेम आणि करूणा असावी लागते, असे प्रतिपादन मेळघाटातील

रवींद्र आणि स्मिता कोल्हे : ‘आम्ही बी-घडलो, तुम्ही बी-घडाना’ उपक्रमकाशीनाथ लाहोरे - यवतमाळइतरांना उपकृत करण्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी केलेल्या कार्यातून नकळत समाजसेवा घडते. त्यासाठी प्राणिमात्रांवर प्रेम आणि करूणा असावी लागते, असे प्रतिपादन मेळघाटातील दाम्पत्य डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी येथे केले. ‘प्रयास’ यवतमाळच्यावतीने आयोजित ‘आम्ही बी-घडलो, तुम्ही बी-घडाना’ या उपक्रमांतर्गत येथील महेश भवन येथे झालेल्या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. भान ठेवून योजना आखाण्यात आणि बेभान होऊन काम करावे. या बाबा आमटेच्या शिकवणीनुसार काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एकदा ध्येय निश्चित केल्यानंतर परतीचे दोर निग्रहाने कापून टाकावे लागतात. आज देशासाठी विचारपूर्वक जगण्याची गरज असून, सेवाभावी माणसांची मेळघाटला आजही गरज आहे. यापुढे कुपोषितांसाठी काम करणाऱ्यांना आमची शेती हेलिपॅडसारखी उपयोगी पडणारी असेल. तरूणांनी या कामात झोकून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपल्या शेतीचे आम्ही मालक नसून ट्रस्टी आहेत, नोकर आमचे सहकारी आहेत, या विश्वासाने आम्ही कार्य करतो म्हणून यशस्वी झालो असे ते म्हणाले. यावेळी डॉ. उल्हास जाजू, करूणाताई फुटाणे, शेषरावजी डोंगरे, शंकर बडे, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विजय देशपांडे, उपस्थित होते. मृणालिनी चितळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिताने हसतखेळत उत्तरे दिली. अनेक थरारक अनुभवही त्यांनी सांगितले. बैरागड सारख्या दुर्गम ठिकाणी काम करताना येणाऱ्या अडचणी चित्तथराक होत्या. आपल्या लगनची गोष्ट स्मितातार्इंनी मनोरंजक पद्धतीने सांगून वातावरण मोकळे केले. लग्नासाठी ठेवलेल्या चार अटीत स्वधर्म दडलेला आहे, असे जाणवल्यामुळेच मी त्यांच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला असेही त्यांनी सांगितले. स्वत:वर बेतले की माणसे तत्व बाजूला ठेवून वागतात मात्र कोल्हे परिवाराने कथनी आणि करणी यात साम्य ठेवल्याने सर्वांचा विश्वास संपादित करण्यात त्यांना यश आले असेही नम्रपणे त्यांनी सांगितले.