शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

कर्जमाफीची सहा हजारांवर प्रकरणे फेटाळली

By admin | Updated: December 11, 2015 03:01 IST

तब्बल वर्षभरापूर्वी हिवाळी अधिवेशनात सरकाराने सावकारी कर्जमाफीची घोषणा केली होती. यात सरसकट कर्जमाफी होणार होती.

सावकारी कर्जमाफी ठरली मृगजळ : तीन तालुक्यांनी प्रस्तावच दिले नाहीरूपेश उत्तरवार यवतमाळ तब्बल वर्षभरापूर्वी हिवाळी अधिवेशनात सरकाराने सावकारी कर्जमाफीची घोषणा केली होती. यात सरसकट कर्जमाफी होणार होती. प्रत्यक्षात सावकारी कर्जाचे जिल्ह्यातील साडेसहा हजार प्रकरणे फेटाळण्यात आल्याचे पुढे आले आहे. तर दुसरीकडे वर्ष लोटलेतरी पाच तालुक्यांना अहवालच सादर करता आले नाही. यामुळे सावकारी कर्जमाफीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असून ही योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. बँकाकडून दिले जाणारे कर्ज अपुरे पडते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीवर मात करण्यासाठी सावकाराकडे धाव घ्यावी लागते. अनेक शेतकरी सावकारी जाचाने उध्वस्त झाले आहेत. त्यांना वाचविण्यसाठी राज्य शासनाने सावकारी कर्जमाफीचा निर्णय घेतला. यामुळे सावकारी कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. जिल्ह्यात परवानाधारक सावकारांनी सात हजार ८७ शेतकऱ्यांना सहा कोटी नऊ लाखांचे कर्ज दिले होते. प्रत्यक्षात त्रृटीपूर्ण प्रस्ताव दाखल झाले. यामुळे सहा हजार ७५४ कर्ज माफीचे प्रकरण फेटाळण्यात आले. कर्ज माफीचे ३३३ प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने मंजूर झाले आहेत. यामध्ये सात तालुक्यांचा समावेश आहे. सातबारा नसणे, शेतकऱ्यांचा पत्ता न मिळणे, कार्यक्षेत्राबाहेर कर्ज वितरण होणे या बाबीमुळे सावकारी कर्जमाफीचे प्रकरण फेटाळण्यात आले आहेत.यासंदर्भात प्रारंभी जूनपूर्वी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना होत्या. मात्र हे प्रस्ताव सावकारांकडून दाखल झाले नाही. यामुळे याची मुदत वाढविण्यात आली. ३१ डिसेंबरपूर्वी सर्व प्रस्ताव सादर करून अंतिम अहवाल तयार करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले होते. यानंतरही पाच तालुक्यांनी अहवाल दिले नाही. यामध्ये दारव्हा आणि आर्णी तालुक्याने सावकारी कर्जमाफीचे पात्र प्रस्ताव दिलेच नाही. घाटंजी, पांढरकवडा आणि नेर तालुक्यातुन कर्जमाफीचे प्रस्ताव सहकार विभागाकडे दाखल झालेच नाही.