शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१५ तालुक्यांची स्थिती चिंताजनक

By admin | Updated: August 14, 2014 00:05 IST

सुरुवातीपासूनच दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट उभे केले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ तालुक्यांची पीक स्थिती अतिशय गंभीर असून या तालुक्यात ५० टक्क्यापेक्षा

यवतमाळ : सुरुवातीपासूनच दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट उभे केले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ तालुक्यांची पीक स्थिती अतिशय गंभीर असून या तालुक्यात ५० टक्क्यापेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पिकांंना वाढीसाठी पोषक वातावरण नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा यंदा सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. जून ते आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यात सरासरी ७० ते ८० टक्के पाऊस कोसळतो. मात्र यावर्षी केवळ ३३ टक्केच पाऊस कोसळला आहे. यामुळे पिकांची स्थिती चिंताजनक झाली आहे. शेतातील पिके करपत चालली असून शेतकरी आकाशाकडे पाहत आहे. यवतमाळ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. आॅगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात ३०४.८४ मिमी पाऊस झाला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ३३.५० टक्के आहे. नेर तालुक्यात ५७.१० टक्के पावसाची नोंद आहे. इतर तालुक्यात स्थिती गंभीर आहे. यवतमाळमध्ये ४८.५६ टक्के, बाभूळगाव ४८.७२ टक्के, कळंब २८.५८ टक्के, आर्णी ३०.९८ टक्के, दारव्हा ३६.१४ टक्के, दिग्रस २३.८५ टक्के, पुसद २०.१० टक्के, उमरखेड १९.८६ टक्के, महागाव २३.६४ टक्के, केळापूर २२.९४ टक्के, घाटंजी २२.९८ टक्के, राळेगाव ३५.३९ टक्के, वणी ४२.८१ टक्के, मारेगाव ४४.८३ टक्के आणि झरीजामणीत २९.४८ टक्के पावसाची नोंद झाली. साधारणत: आॅगस्ट महिन्यात ५० टक्के पेक्षा पाऊस कमी असलेले तालुके शासन दुष्काळग्रस्त घोषित करते. (शहर वार्ताहर)