शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, भाजी विकून भजे खाण्यापुरतेही पैसे मिळत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:06 IST

‘साहेब, घाम गाळून कमी पाण्यात भाजीपाला पिकविला. मार्केटमध्ये विकायला नेला तर फुलकोबीचा २० किलोचा कट्टा ३० रुपयाला तर टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला ५० रुपये मिळतात. शेतापासून मार्केटपर्यंत भाजीपाला नेण्याचा खर्चही निघत नाही.

ठळक मुद्देविदर्भातील भाजी उत्पादकांचे भीषण वास्तवफुलकोबी, टोमॅटो आणि पालक बाजारात कवडीमोल

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘साहेब, घाम गाळून कमी पाण्यात भाजीपाला पिकविला. मार्केटमध्ये विकायला नेला तर फुलकोबीचा २० किलोचा कट्टा ३० रुपयाला तर टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला ५० रुपये मिळतात. शेतापासून मार्केटपर्यंत भाजीपाला नेण्याचा खर्चही निघत नाही. साहेब, भाजी विकून शहरात भजे खायलाही पैसे उरत नाही’ महागाव तालुक्यातील गुंजचे नारायण खंदारे अतिशय हताशपणे सांगत होते. ही एकट्या गुंजच्या शेतकऱ्याची व्यथा नाही, तर सध्या भाजीपाल्याच्या पडलेल्या भावाने शेतकऱ्यांची अशीच अवस्था झाली आहे.गत तीन-चार महिन्यांपासून दारावर येणारा भाजी विक्रेता दहा रुपयाला दीड किलो टोमॅटो देत आहे. फुलकोबी आणि पालकाचीही असेच दर आहे. सर्व स्वस्ताई जणू भाजीपाल्यावरच आल्याचे दिसत आहे. दारावरचा भाजी विक्रेता दहा रुपयात दीड किलो टोमॅटो विकत असेल तर ज्याच्या शेतात पिकले त्या शेतकऱ्याला काय मिळत असेल हा मन सुन्न करणारा प्रश्न आहे. भाजी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा उतरलेल्या दरांनी उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे वास्तव पुढे आले.माळकिन्ही येथीलच अनिल दुपारते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून तर मार्केटमध्ये पायही ठेवला नाही. शेतात जाण्याची इच्छाही होत नाही. विठ्ठल दैत यांनी भाजीपाला विकूनही काही हातात उरत नाही. घर खर्च कसा चालवावा, मुलांचे शिक्षण कसे करावे, असा सवाल त्यांनी केला. बिजोराचे ज्ञानेश्वर कड यांनी अर्ध्या एकरात मलचिंग पेपर टाकून टोमॅटोची लागवड केली. गत आठवड्यात माहूरच्या बाजारात टोमॅटो विकायला नेले तेव्हा दहा रुपये कॅरेटचा भाव आला.नारायण खंदारे सांगत होते, यवतमाळपर्यंत नेण्यासाठी टोमॅटोच्या कॅरेटमागे ३५ रुपये खर्च येतो. तेथे गेल्यावर ५० रुपये कॅरेट प्रमाणे हाती येतात. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याचे अनेक शेतकरी सांगत होते.भाजीपाला उत्पादनात एकरी २० हजार तोटामहागाव तालुक्यातील माळकिन्ही हे जिल्ह्यातील सर्वाधिक भाजीपाला पिकविणारे गाव. येथील प्रकाश खंदारे सांगत होते, फुलकोबी शेतातच सडत आहे. टोमॅटो काढायला मजुरी परवडत नाही. मशागतीपासून तर विक्रीपर्यंतचा हिशेब लावला तेव्हा प्रती एकर २० हजार रुपयाने आम्ही तोट्यात आलो. टोमॅटोच्या एक एकर शेतीच्या मशागतीसाठी पाच हजार रुपये, बियाण्यांसाठी पाच ते सात हजार रुपये, टोमॅटोची झाडे सुतळीने बांधण्यासाठी चार हजार रुपये खर्च, फवारणीसाठी तीन हजार रुपये आणि माल तोडण्यासाठी एकरी पाच हजार रुपये खर्च येतो. एवढे करूनही बाजारात टोमॅटोचे कॅरेट ३० ते ३५ रुपयाला जात असेल तर जगायचे कसे असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :agricultureशेती