शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पुसद बाजार समितीत शुकशुकाट

By admin | Updated: July 14, 2016 02:33 IST

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा निर्णय शासनाने घेतल्याने या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक झाले

शेतकऱ्यांचे हाल : सोमवारपासून व्यापारी संपावर, अडत वसुलीला विरोध पुसद : शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा निर्णय शासनाने घेतल्याने या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाला असून सलग तिसऱ्या दिवशी बाजार समितीत शुकशुकाट होता. शासनाने बाजार समिती नियमातून फळे, भाजीपाला वगळ्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यात खदखद होती. त्यातच यापुढे शेतमालाच्या विक्रीसाठी आकारली जाणारी तीन टक्के अडत आता खरेदीदारांकडून वसूल करण्याचा निर्णय झाल्याने व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुसद बाजार समितीतील १३० अडते-व्यापारी सोमवारपासून संपात सहभागी झाल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. या बाजार समितीत प्रतिवर्षी सरासरी दोन लाख क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री होते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी फारसा शेतमाल शिल्लक नसला तरी अडचणीतील शेतकरी थोडाफार माल घेवून अडतीवर येतात. मात्र संपामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. बाजारात दिवसभर थांबूनही ग्राहक मिळत नसल्याने शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेला माल एक तर परत घेवून जावा लागत आहे. अथवा कवडीमोल भावाने विक्री करावा लागत आहे. त्यातही किरकोळ बाजारात काही छोटे व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत माल खरेदी करून तो चढ्या भावाने विकत आहेत. दुसरीकडे संपामुळे बाजार समितीत मधील हमाल, तोलाई कामगार या कष्टकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अडत दुकानातील व्यवहार बंद असलयने त्याचा परिणाम इतर बाजारपेठेवर झाला आहे. शेतमाल विक्री करून शेतकरी इतर वस्तूंची खरेदी स्थानिक बाजारपेठेतून करत असतो. त्यामुळे स्थानिक व्यापारी बाजारात व्यवहारावरही परिणाम झाला आहे. संपाचा फटका व्यापाऱ्यांसह ग्राहक, शेतकरी, हमालांना बसत आहे. संपामुळे बाजार समितीचा व्यवहार ठप्प असून अडते, व्यापाऱ्यांशी चर्चा केली. पण तडजोड झाली नाही. शासनाकडून जसे निर्देश येतील त्याची अंमलबजावणी बाजार समिती करेल, अशी माहिती बाजार समितीचे सचिव शिवाजी मगर यांनी दिली. सरकारने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेवून आमच्या मागण्या बाबत सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला अडते व्यापारी मदत करीत असतो, असे मत अडते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय भांगडे यांनी व्यक्त केले. शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी संप पुकारला असून मागील तीन दिवसांपासून आमच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. संप तीन दिवसापासून असला तरी रविवारपासूनच मार्केट बंद आहे. त्यामुळे लवकर हा संप मिटला नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, असे मत शंकर ताडसे हमालाने व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)