शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात ठाणेदारांमध्ये फेरबदल

By admin | Updated: May 29, 2017 00:47 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील २८ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक

प्रशासकीय बदली : २८ जणांचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील २८ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वत्रिक बदल्यांची यादी जाहीर झाली. या यादीत २८ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यवतमाळ शहरचे ठाणेदार नंदकिशोर पंत यांना आर्णीच्या ठाणेदारपदी, तर नियंत्रण कक्षातील बाळासाहेब खाडे यांना वडगाव रोडच्या ठाणेदारपदी नेमण्यात आले. नियंत्रण कक्षातील यशवंत बावीस्कर यांना यवतमाळ शहरचे ठाणेदार बनविण्यात आले. पांढरकवडाचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांना जिल्हा विशेष शाखेत बसविण्यात आले. त्यांच्या जागी मुकुटबनचे ठाणेदार असलम खान यांना नियुक्ती दिली. आर्णीचे ठाणेदार संजय खंदाडे यांची राळेगावचे ठाणेदार म्हणून तर राळेगावचे ठाणेदार अरुण आगे यांची पोलीस कल्याण शाखेत बदली करण्यात आली. वणी येथील उपजिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबूसिंग राठोड यांना नियंत्रण कक्षात, तर नियंत्रण कक्षातील एपीआय प्रकाश राऊत यांना बिटरगाव ठाणेदार पदी नेमण्यात आले. यवतमाळ शहर ठाण्यातील संग्राम ताटे यांना वणी येथे वाहतूक शाखेत, एपीआय समाधान धंदरे यांची यवतमाळ ग्रामीणमधून घाटंजी, आर्णीचे एपीआय सतीश वळवी यांची दिग्रस, उमरखेडचे सदाशिव भडीकर यांची महागाव, पुसद शहरचे धीरज चव्हाण यांची तेथेच वाहतूक शाखेत बदली झाली. वणीच्या वाहतूक शाखेतील एपीआय विजय कसोधन यांची यवतमाळ शहर, कळंबचे संघरक्षक भगत यांची दारव्हा, नियंत्रण कक्षातील एपीआय उदय साळवी यांची कळंब येथे बदली झाली. याशिवाय पीएसआय संतोष मनवर, राहुल किटे, रंगनाथ जगताप, वसंत मडावी, संतोष माने, संजीव खंदारे, राजकिरण मडावी, रवी वाहुळे, राजू राऊत, यशवंत वाणी, विजय ढाके यांचीही बदली करण्यात आली. याशिवाय एक सहायक निरीक्षक व चार उपनिरीक्षकांची विनंती बदली झाली.