शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

गल्लीबोळात शिकवणी वर्गांची दुकानदारी

By admin | Updated: July 15, 2014 00:15 IST

पुसद शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाची दुकानदारी सुरू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करीत लाखो रुपये कमावले जात आहे. या शिकवणी वर्गामुळे पालक अगतिक झाले

पुसद : पुसद शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाची दुकानदारी सुरू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करीत लाखो रुपये कमावले जात आहे. या शिकवणी वर्गामुळे पालक अगतिक झाले असून मुलांना शिकवणी वर्गाला पाठविण्यासाठी धडपड सुरू आहे. यामुळे नामवंत शाळा, महाविद्यालयाच्या तासिका बुडवून विद्यार्थी शिकवणी वर्गात नियमित जाताना दिसतात. स्पर्धेच्या युगात टक्केवारीला महत्त्व आले आहे. प्रत्येक पालकाला आपला मुलगा ९० टक्केच्यावरच गुण घेणारा असावा, असे वाटते. यासाठी तो वाट्टेल तो करायला तयार असतो. याच मानसिकतेचा फायदा शिकवणी वर्ग चालकांनी घेतला आहे. पुसद शहरातील गल्लीबोळात शिकवणी वर्ग सुरू झाले आहे. नर्सरीपासून अभियांत्रिकीपर्यंत शिकवणी वर्ग सुरू आहे. आपल्याकडे विद्यार्थी खेचण्यासाठी सध्या या शिकवणी वर्ग चालकाचे जाहिरात युद्ध सुरू आहे. दहावी-बारावीच्या निकालानंतर आपल्या क्लासच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटो फ्लेक्सवर लावून जाहिरात केली जात आहे. याठिकाणी कोणत्या सुविधा मिळणार याचीही माहिती दिली जाते. शहरात नजर टाकली तरी विविध शिकवणी वर्गांचे फलक दृष्टीस पडतात. मात्र याच शिकवणी वर्गातून नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी मात्र शिकवणी संचालक झटकताना दिसून येतात. ते आमचे विद्यार्थी असले तरी त्यांनी अभ्यास केलाच नसेल, असे सांगतात. गुणवंताचे श्रेय घ्यायचे आणि नापासांना दूर करायचे, असा हा प्रकार सुरू आहे. शिकवणी वर्गांचे पेव फुटल्याने शाळा-महाविद्यालयात जाण्याऐवजी विद्यार्थी शिकवणी वर्गात नेहमी जात आहे. याठिकाणी कोणत्या सुविधा आहे, याची चाचपणीही पालक करीत नाही. मुलगा सांगतो म्हणून त्याच शिकवणी वर्गाला पाठविले जाते. भरमसाठी फी घेऊन गुणवंतांना गुणवंत करणारे हे शिकवणी वर्ग नापासांना कधी पास करतील, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र शिक्षणाच्या या बाजारीकरणापुढे पालक अगतिक दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)