शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

जैन भागवती दीक्षा समारोहानिमित्त शोभायात्रा

By admin | Updated: September 5, 2014 00:07 IST

येथील प्रतिष्ठित व्यावसायिक आणि श्रद्धानिष्ठ श्रावक भवरीलाल भिकमचंद छलाणी यांची नात आणि अशोक छलाणी यांची सुकन्या मुमुक्षू कविता छलाणी ही जैन भागवती दीक्षा घेत आहे. त्यानिमित्त आर्णी

आर्णी : येथील प्रतिष्ठित व्यावसायिक आणि श्रद्धानिष्ठ श्रावक भवरीलाल भिकमचंद छलाणी यांची नात आणि अशोक छलाणी यांची सुकन्या मुमुक्षू कविता छलाणी ही जैन भागवती दीक्षा घेत आहे. त्यानिमित्त आर्णी शहरातून आज शोभायात्रा काढण्यात आली. दिल्ली येथील आध्यात्म साधना केंद्रात ५ आॅक्टोबर रोजी जैन श्वेतांबर तेरापंथ संघाचे अनुव्रत, अनुशास्ता, ज्योतीपूंज, आचार्य, नहाश्रमजी यांच्या करकमलाद्वारे कविता जैन भागवती दीक्षा घेणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आर्णी येथे करण्यात आले आहे. गुरुवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शनिवार, ६ सप्टेंबर रोजी मंगल भावना समारोह व गौतम प्रासादी होणार आहे. २८ सप्टेंबरला आर्णी येथून कविता दिल्ली करीता प्रस्थान करणार आहे. भौतिक संसारिक सुखसुविधांचा त्याग करून आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करीत आहे. दीक्षा घेणाऱ्या कविताची आर्णी शहरात शोभायात्रा काढण्यात आली.र् ईश्वर दुग्गड यांच्या निवासस्थानावरून ही शोभायात्रा काढण्यात आली. एका सजविलेल्या रथात मुमुक्षू कविता आणि सोबत भवरीलाल छलाणी विराजमान होते. या शोभायात्रेत मंगल कलशधारी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रा छलाणी यांच्या निवासस्थानी पोहचली. या शोभायात्रेत रमेश सुराणा, प्रवीण दुगड, गोपाल कोठारी, अशोक छलाणी, दिलीप छलाणी, रवी छलाणी, गौतम छलाणी, प्रवीण छलाणी, प्रकाश छलाणी, राजू कोठारी, रवी बोरा, संजय बोरा, सुशिल बोरा, पारसमल जैन, दिनेश झांबड, राजेश लढ्ढा, शंकर अग्रवाल, भिकू पटेल, कांतीलाल कोठारी, कन्हेरीलाल कोठारी, कमलकिशोर बंम, शांतीलाल कोठारी, मुन्नासेठ झांबड आदी असंख्य जैन बांधव सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)