शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

शिवचरित्रावर आधारित सामान्यज्ञान परीक्षा

By admin | Updated: February 15, 2017 02:52 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८७ व्या जयंतीनिमित्त शिवचरित्रावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

पुसद येथे आयोजन : सहा हजार विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग पुसद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८७ व्या जयंतीनिमित्त शिवचरित्रावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आठ केंद्रांवर सहा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयता चार ते सातच्या अ गट तर आठ ते पदवीच्या ब गट अशा दोन गटात ही परीक्षा घेण्यात आली. कोषटवार (दौ) विद्यालय, गुणवंतराव देशमुख विद्यालय, शिवाजी विद्यालय, मातोश्री विद्यालय, एमपीएन कॉन्व्हेंट, ज्योतीर्गमय स्कूल, मुंगसाजी विद्यालय व लोकहित विद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. शहरातील विविध सामाजिक संघटना प्रमुख, पदाधिकारी, संस्थाप्रमुख, नगरसेवक, छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते आदींनी पुढाकार घेतला. विविध जाती धर्माच्या शिक्षक व शिवप्रेमी बंधू भगिनींनी दिलेले योगदान अभिमानास्पद होते. पुसदच्या इतिहासातील पहिलीच इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली शिवचारित्र्यावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा यशस्वीरीत्या झाली. शाळांमध्ये, शाळांतील वाचनायलातील छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके, वाचन साहित्य, आणि इंटरनेटच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा अभ्यास केल्याचे निदर्शनास आले. येत्या १९ तारखेला शिवजयंती दिनी या परीक्षेचे विजेते घोषित केल्या जाणार आहेत. दरम्यान डॉ आनंद मुखरे, श्रीकांत सरनाईक शिक्षण विभागाचे प्रकाश घोडेकर, साखरे, दिगंबर जगताप आदींनी केंद्राला भेटी दिल्या. विजेत्यांना रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या निमित्ताने शहरातील सर्वच वाचनालयात शिवचरित्रावर आधारित पुस्तकांची मागणी वाढली होती. सर्व संस्था प्रमुख व कॉमर्स अकादमी, स्टुडंट एजुकेशनल अकादमीच्या सहकार्याने या परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक अजय क्षीरसागर, परीक्षा संयोजक चंद्रकांत ठेंगे, कौस्तुभ धुमाळे यांनी सांगितले. या निमित्ताने बालवयात विदयार्थ्यांनी शिवचरित्र वाचावे व त्या पासून प्रेरणा घ्यावी या हेतुने हे आयोजन करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)