शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधीच्या दिशेने शिवसेनेची पक्षबांधणी

By admin | Updated: March 30, 2017 00:02 IST

राज्यात शिवसेना-भाजपा युती सरकारचे भवितव्य काय, याच्या संख्याबळाच्या आधारावर राजकीय चर्चा झडत असतानाच

लवकरच फेरबदल : पदाधिकाऱ्यांना विधानसभेसाठी मोकळे करणार, अनेकांना मिळणार बढती यवतमाळ : राज्यात शिवसेना-भाजपा युती सरकारचे भवितव्य काय, याच्या संख्याबळाच्या आधारावर राजकीय चर्चा झडत असतानाच यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेने मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने पक्ष बांधणी सुरू केली आहे. त्यासाठी जिल्हा शिवसेनेत व्यापक फेरबदल केले जाणार आहेत. राज्यात युतीचे सरकार असले, तरी भाजपा-शिवसेनेतील संबंध बिघडले आहेत. भाजपा दुय्यम वागणूक देत असल्याचा सेनेतील सूर आहे, तर शिवसेना सत्तेत असूनही विरोधकांच्या भूमिकेत वावरत असल्याचा भाजपाचा आरोप आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीप्रमाणे जणू विरोधकाची भूमिका वठवित भाजपाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच भाजपातसुद्धा ‘आता बस्स झाले’ असा सूर ऐकायला मिळतो आहे. यावरून दोनही पक्ष पुढील कोणत्याही परिणामाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यादृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातही शिवसेनेकडून चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे. शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड स्वत: तालुकानिहाय बैठका घेऊन ‘मध्यावधी झाल्यास काय चित्र राहील’ याचा आढावा घेत आहेत. शिवसेना तर उघडपणे मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने पक्ष बांधणीची तयारी करताना दिसत आहे. शिवसेनेतील विद्यमान प्रमुख पदाधिकाऱ्यांना विधानसभेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून पदमुक्त केले जाणार आहे. अधिकाधिक वेळ पक्ष बांधणी व जनतेत घालविण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. या महत्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पक्षातीलच तरुण चेहऱ्यांना बढती देऊन त्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. त्यात एका जिल्हा परिषद सदस्यालाही लॉटरी लागून आठ तालुक्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता सेनेच्या गोटात वर्तविली जात आहे. यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात आता लगतच्या आठ ग्रामपंचायती समाविष्ट झाल्याने शहराचा व्याप वाढला आहे. म्हणूनच यवतमाळ शहरासाठी शिवसेनेचे पूर्व-पश्चिम असे दोन प्रमुख नेमण्याचा विचारही केला जात आहे. विधानसभेच्या दृष्टीने गतवेळच्या पराभूतांंनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यवतमाळ शहराचा विचार केल्यास येथे शिवसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेला ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या तुलनेत शहरात सेनेची ताकद कमी पडली होती. त्यामुळे अवघ्या १२०० मतांनी सेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु आता चित्र बदलले आहे. यवतमाळचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. नगराध्यक्षांना तब्बल ४३ हजारांवर मते मिळाली होती. यवतमाळ नगरपरिषदेत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एक वरून तब्बल आठवर पोहोचली आहे. या माध्यमातूनही सेनेची ताकद प्रचंड वाढली आहे. त्या बळावरच यवतमाळ विधानसभा काबीज करून भाजपाला त्यांची जागा दाखविण्याची व्यूहरचना शिवसेनेत आखली जात आहे. यवतमाळ विधानसभेत ऐनवेळी इच्छुकाचा चेहरा बदलविला जाण्याची व निवडणुकीचा दीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या व्यक्तीला निवडणुकीच्या आखाड्यात पुन्हा उतरविले जाण्याची शक्यता सेनेच्या गोटात वर्तविली जात आहे. या मतदारसंघातील प्रबळ दावेदार स्वत:हून बाजूला होण्यास तयार असल्याने नव्या चेहऱ्याला संधी देण्यात फारशा अडचणी नेत्यांपुढे राहणार नसल्याचे सेनेच्या गोटातून सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी) भाजपाचीही चाचपणी, योजनांवर भर शिवसेनेची तयारी पाहता भाजपाही मागे नाही. विविध बैठका व आढाव्याच्या आडोश्याने भाजपा नेतेही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून मध्यावधीबाबत त्यांची मते जाणून घेतली जात आहे. शिवाय शासनाच्या योजना गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यावर भर सुरू आहे. या अनुषंगाने नुकताच येथे पंचायत समिती गणनिहाय आढावा घेतला गेला. मध्यावधीबाबत भाजपाची नेते मंडळी अधिकृतरीत्या काहीही बोलत नसली, तरी प्रत्यक्षात त्याच्या तयारीचे संकेत त्यांच्या सततच्या कार्यक्रमांवरून मिळत आहे.