शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:17 IST

राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलोमीटर प्रवासाकरिता सवलत बहाल केली आहे. ही सवलत मिळविण्यासाठी यापुढे स्मार्टकार्डचा वापर होणार आहे. हे स्मार्टकार्ड मिळविण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात गर्दी केली आहे. या ठिकाणी गर्दी वाढताच लिंक फेल होण्याचे प्रकार वाढले आहे. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बुधवारी सहन करावा लागला.

ठळक मुद्देयवतमाळच्या बसस्थानकावर गर्दी : लिंक फेलमुळे सारेच वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलोमीटर प्रवासाकरिता सवलत बहाल केली आहे. ही सवलत मिळविण्यासाठी यापुढे स्मार्टकार्डचा वापर होणार आहे. हे स्मार्टकार्ड मिळविण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात गर्दी केली आहे. या ठिकाणी गर्दी वाढताच लिंक फेल होण्याचे प्रकार वाढले आहे. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बुधवारी सहन करावा लागला.राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलो मीटरचा प्रवास करता येणार आहे. पूर्वी मतदान कार्ड, आधारकार्ड असले तरी या योजनेचा लाभ मिळत होता. आता स्मार्टकार्ड खेरीज अर्ध्या तिकीटचा प्रवास थांबणार आहे. स्मार्टकार्ड अनिवार्य झाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली आहे.सकाळी ७ वाजतापासून ज्येष्ठ नागरिकांच्या लाईन राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात पहायला मिळत आहे. बुधवारी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या लाईन लागल्या होत्या. मात्र दूपारपर्यंत कर्मचारी न पोहोचल्याने ज्येष्ठ नागरिकांनी चांगलाच संताप नोंदविला. या ठिकाणी सोईसुविधा पुरविण्याची मागणी केली आहे.वयोवृध्दांची संख्या जास्त असताना केवळ एकच खिडकी परिवहन महामंडळाने ठेवली आहे. त्यातही नोंदणी संथगतीने केली जाते. हा प्रकार थांबावा वा वितरण प्रणालीत सुुुधारणा करावी, अशी मागणी सुंदर जाधव, पांडुरंग बोेरकर, लिलाबाई जाधव, कांताबाई शिंदे, शोभा दळवी यांनी केली आहे. महामंडळ प्रशासनाने वृद्धांचा त्रास करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.