शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या नावे होणार आता सातबारा

By admin | Updated: July 31, 2016 01:18 IST

महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

महसूल आठवडा : अंमलबजावणी महाराजस्व अभियानाची, महिलांचा होणार सत्कार यवतमाळ : महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये विशेषत: महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. खासकरून शेतीचा सातबारा महिलांच्या नावावर करण्याचे काम या सप्ताहात पार पाडले जाणार आहे. ‘सातबारा ज्यांच्या नावे त्या भगिनींसाठी शासन धावे’, ‘अथवा ताई मावशी अक्का, आता जग जिंका’ अशी महसूल आठवड्याची टॅग लाईन आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच महसूल दिनाची शपथ कर्मचाऱ्यांकडून घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली. महिलांच्या सबलीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याची अंमलबजावणी महसूल सप्ताहापासून करण्यात येणार आहे. साधारणत: सातबारावर महिलांचे नाव नोंदविले जात नाही. या मोहिमेतून सातबारा आणि आठ ‘अ’ मध्ये महिला कुटुंब प्रमुखाचे नाव राहणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महसूल विभागाशी निगडित प्रश्नासोबतच कृषी, सहकार, बालकल्याण, विभागाच्या योजनांची माहितीही महिलांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत गावपातळीवर मेळावे आणि मोहिमेद्वारा महिला खातेदारांसाठी माहिती सल्ला आणि प्रोत्साहन देण्याचे उपक्रम राबविले जाणार आहे. गावागावात महिलांच्या नावाने असलेल्या सातबारांचे वाचन करण्यात येणार आहे. जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र देण्यासाठी पूर्वी शेतकऱ्यांच्या मुलांना पैसे लागायचे. आता बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून दोन लाख रुपये भरण्यात आले. हे दाखले शेतकऱ्यांच्या पाल्याना मोफत मिळणार आहे. उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा प्रशासनामार्फत सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, महसूल उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, एनआयसी प्रमुख उमेश घुगुसकर, बळीराजा चेतना अभियानाच्या ज्युनिअर प्रोग्रामर सोनल झोळ आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)