शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

साडेबाराशे क्विंटल साखर घोटाळयावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: July 3, 2014 23:47 IST

यवतमाळ तालुक्यात झालेला साखर घोटाळा चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ३ जुलैला अमरावती विभागीय पुरवठा उपायुक्त माधवराव चिमाजी जिल्हा दौऱ्यावर आले होते.

यवतमाळ : यवतमाळ तालुक्यात झालेला साखर घोटाळा चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ३ जुलैला अमरावती विभागीय पुरवठा उपायुक्त माधवराव चिमाजी जिल्हा दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांना तहसीलदार अनुप खांडे यांनी या घोटाळ्याचा सुक्ष्म चौकशी अहवाल त्यांच्या सुपूर्द क ेला. त्यामध्ये २०१० ते ११ या वर्षात साखर पुरवठादाराने तब्बल साडेबाराशे क्विंटल साखरेचा अपहार केल्याचे म्हटले आहे. यवतमाळ तालुक्यातील रास्त भाव दुकानांना एका खासगी पुरवठादारामार्फत साखर पुरविली जाते. २०१० ते २०११ या आर्थिक वर्षात साखर पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी आणि अमरावती विभागीय आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाची यवतमाळ तहसीलदारांमार्फत चौकशी सुरू होती. या चौकशीचा आढावा घेण्यासाठी आज अमरावती विभागीय पुरवठा उपायुक्त माधवराव चिमाजी यवतमाळ दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर यांच्याकडून साखर घोटाळ्याची माहिती आणि चौकशीची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर उपायुक्त चिमाजी हे येथील तहसील कार्यालयात धडकले. त्यांनी या वेळी तहसीलदार अनुप खांडे यांच्याकडून आतापर्यंत केलेल्या चौकशीचा आढावा घेतला. त्यानंतर तहसीलदार खांडे यांनी उपायुक्त चिमाजी यांच्याकडे चौकशीचा अहवालच सादर केला. त्यामध्ये २०१० ते २०११ या आर्थिक वर्षात यवतमाळ तालुक्यात तब्बल एक हजार २५० क्विंटल साखरेचा घोटाळा झाला असल्याचे नमूद केले आहे. तसेच या अहवालाची एक प्रत जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले. या अहवालातील घोटाळ्याचे बारकावे तपासून लवकरच संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी उपायुक्त चिमाजी यांनी तक्रारकर्त्यांना दिल्याचेही तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे साखर पुरवठादार चांगलाच अडचणीत येण्याचे संकेत निर्माण झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)