शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

धनोडा पुलावरून रात्रीपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ दीर-भावजयीचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST

हेमंत हा सोनालीचा चुलत दीर आहे. हेमंत अविवाहित असून सोनालीचा १५ वर्षांपूर्वी हेमंतचा चुलत भाऊ संदीप चिंचोलकर  यांच्याशी विवाह झाला. चालबर्डी, ता. भद्रावती हे सोनालीचे माहेर आहे. १ ऑगस्टला सोनाली चुलत दिरासोबत घरून निघून गेल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी गुरुवारी माहूर पोलिसांना दिली. सोनालीच्या भावाने भद्रावती पोलिसांकडे तेव्हाच मिसिंगची तक्रार दिल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील धनोडा येथे पुलावरून बुधवारी रात्री पैनगंगेच्या पात्रात उडी घेतल्याचा संशय असलेले तरुण आणि तरुणी नात्याने दीर-भावजय असल्याची माहिती पुढे आली. पुलाच्या लोखंडी कठड्याला एक बॅग व पर्स अडकून होती. त्यात तरुणाचे आधारकार्ड आहे. बॅगमध्ये पासपोर्ट फोटोसह बिस्कीट पुडा व नास्त्याचे अन्य साहित्य सापडले होते. पुलावर दोघांच्याही चप्पल आढळून आल्या. आधार कार्डवर  तरुणाचे नाव  हेमंत राजेंद्र चिंचोलकर (३१), तर महिलेचे नाव सोनाली संदीप चिंचोलकर असून दोघांचाही शोध सुरू असल्याची माहिती गुरुवारी माहूर पोलिसांनी दिली.हेमंत हा सोनालीचा चुलत दीर आहे. हेमंत अविवाहित असून सोनालीचा १५ वर्षांपूर्वी हेमंतचा चुलत भाऊ संदीप चिंचोलकर  यांच्याशी विवाह झाला. चालबर्डी, ता. भद्रावती हे सोनालीचे माहेर आहे. १ ऑगस्टला सोनाली चुलत दिरासोबत घरून निघून गेल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी गुरुवारी माहूर पोलिसांना दिली. सोनालीच्या भावाने भद्रावती पोलिसांकडे तेव्हाच मिसिंगची तक्रार दिल्याची माहिती आहे.सोनालीला अनुक्रमे ९ आणि १३ वर्ष वयाच्या दोन मुली असल्याची माहिती आहे. एक महिन्यापासून कुटुंबीय या दोघांचा शोध घेत आहेत. हेमंत आणि सोनाली बुधवारी सायंकाळी बसने धनोडा येथे आले. त्यांनी या ठिकाणी तब्बल २ तास घालवले. नंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांची बॅग, पर्स आणि चप्पल पुलाजवळ आढळल्या. या दोघांनी पैनगंगेत उडी घेऊन जीवाचे बरेवाईट केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर नदीपात्रात त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागला नाही. माहूरचे ठाणेदार नामदेव रिठे प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

माहूर पोलीस दोघांच्याही शोधात - हेमंत राजेंद्र चिंचोळकर व सोनाली संदीप चिंचोलकर  हे नात्याने दीर व भावजय आहे. १ सप्टेंबर रोजी  माहूर हद्दीतील  धनोडा येथील पैनगंगा नदीत  उडी घेऊन ते मरण पावले, असा माहूर पोलिसांना संशय आहे. त्यांच्या बॅग्स  पैनगंगा नदीच्या शेजारील किनाऱ्यावर आढळून आल्या. हेमंत यांचे काका आणि भाऊ गुरुवारी माहूर पोलीस ठाण्यात येऊन भेटून गेले. शेगाव,  ता. वरोरा,  जि. चंद्रपूर येथील  पोलीस ठाण्यामध्ये त्यांची मिसिंग तक्रार दाखल आहे. अद्याप त्यांचा शोध सुरू आहे. नदीकाठच्या गावांशी संपर्कात असल्याचे माहूरचे ठाणेदार नामदेव रिठे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Missingबेपत्ता होणं