शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

नगराध्यक्षांच्या अनधिकृत बांधकामांवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: March 20, 2016 02:14 IST

यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय यांना घराच्या अतिक्रमणातून जिल्हाधिकाऱ्यांनी क्लिनचिट दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : नगरपरिषदेला कारवाईचे आदेश यवतमाळ : यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय यांना घराच्या अतिक्रमणातून जिल्हाधिकाऱ्यांनी क्लिनचिट दिली आहे. परंतु त्यांच्या घराचे सुमारे चार हजार चौरस फुटाचे बांधकाम हे परवान्यापेक्षा अधिक अर्थात अनधिकृत ठरविण्यात आले आहे. सदर अनधिकृत बांधकामाबाबत यवतमाळ नगर परिषदेला तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. नगराध्यक्ष सुभाष राय यांनी बालाजी चौक येथे घरबांधकाम करताना कोणतीच परवानगी घेतली नाही. त्यामुळे त्यांना नगराध्यक्ष पदावरून त्वरित खारीज करावे, अशी तक्रार नीलेश श्यामसुंदर शर्मा (रा. बुलडाणा) या व्यक्तीने केली होती. या तक्रारीनंतर रॉय यांच्या संपूर्ण बांधकामाची नगरपरिषद व नगररचना विभागाकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये राय यांनी प्लॉट क्रमांक ५६ मध्ये ३८५.८० चौरस मीटर इतक्या बांधकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात ५९४.९७ चौरस मीटर बांधकाम केल्याचे आढळून आले. याप्रमाणेच प्लॉट क्रमांक १४९/३ यावर २९०.४५ चौरस मीटर बांधकाम करण्याची परवानगी असताना प्रत्यक्षात ४९६.९२ चौरस मीटर बांधकाम केल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालात नमूद केले. त्यामुळे राय यांनी कोणत्याही जागेवर अतिक्रमण केले नसून मालकीच्या जागेत परवानगीपेक्षा अधिक बांधकाम केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जास्त बांधकामाबाबत नगरपरिषदेने कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. सुभाष राय यांचे नगराध्यक्षपद खारीज करण्याबाबत तक्रारदाराने केलेला अर्ज हा महाराष्ट्र नगरपरिषद , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलमान्वये दाखल केला नाही, केवळ साधा तक्रार अर्ज केला आहे. त्यामुळे ही तक्रार खारिज केली आहे. अनेक दिवसांपासून शहर वासियांचे लक्ष लागून असलेल्या या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. शिवाय राजकीय दृष्टिकोनातून झालेल्या या तक्रारीचे इप्सीत साध्य झाले की नाही, यावर सर्वत्र चर्चा रंगत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर नगराध्यक्ष सुभाष राय यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)