शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बसेस रस्त्यावर

By admin | Updated: June 2, 2014 01:50 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या पुसद आगारातील अध्र्या अधिक ...

राज्य परिवहन महामंडळाच्या पुसद आगारातील अध्र्या अधिक भंगार बसेस सर्रासपणे रस्त्यावर धावत आहेत. यापैकी अनेक बसेसला मोल्ड केलेले टायर बसविण्यात आले असून अनेक बसेसमधील आसने गायब आहेत. या भंगार अवस्थेतील बसेस ग्रामीण भागासह लांब पल्ल्यासाठीही वापरण्यात येतात. बसेसच्या दुर्दशेमुळे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशाना इच्छित स्थळी नेण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. पुसद आगारातून ग्रामीण विभागासह अनेक लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यात येतात. सुरक्षित आणि सुखाचा प्रवास असल्यामुळे हजारो प्रवासी दररोज एसटी बसने प्रवास करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून या आगारातील अनेक बसेस भंगार झाल्या आहे. अनेक बसेस निकामी झाल्या आहेत. परंतु या बसेसला भंगारात न टाकता त्यामधून सर्रास प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. तर अनेक बसेसमधील आसने गायब झाली आहेत. नादुरुस्त इंजिन, खिळखिळ्या झालेल्या खिडक्यामुळे या बसेस सतत आवाज करीत असतात. सध्या उन्हाळा असल्यामुळे आणि बसेसला मोल्ड टायर बसविण्यात आल्यामुळे अनेक बसेसच्या पंरचे प्रमाण वाढले आहे. बस पंर झाली म्हणजे प्रवाशांना हमखास घरी पोहोचण्यास एक ते दीड तास उशीर होतो. रबरी सीट नसल्यामुळे अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.

बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सेवेत उतरलेल्या एसटी महामंडळाच्या अनेक बसगाड्यांची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अनेक वेळा रस्त्यात बस बंद पडून प्रवाशांचे हाल झाल्याचेही पाहावयास मिळतात. काही बस गाड्यांमधील आसन व्यवस्था पूर्णपणे कालबाह्य़ झाली असून अनेक गाड्यांच्या काचा गायब झालेल्या आहेत. गाड्यांचे पत्रेही फाटलेले असल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचपर्यंत वेगवेगळे आवाज ऐकून घ्यावे लागतात. लांब पल्ल्याच्या बसगाड्यांची पण अशी दुरावस्था कधी-कधी पाहावयास मिळते. तिकीट दरवाढ वरच्यावर वाढत असताना एसटी महामंडळ सुविधादेण्यात मात्र कुचराई करीत आहे, असा प्रवाश्यांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे विशेष करुन भंगार बसेस ग्रामीण भागासाठी सोडण्यात येते. दुसरे कुठलेही साधन नसल्यामुळे प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून भंगार बसेसने प्रवास करावा लागत आहे. नादुरुस्ती इंजिनमुळे अनेक बसेस मधातच बंद पडत आहेत. बसेसच्या खस्ता हालतमुळे भविष्यात एखादी मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.