शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

बचतगटाच्या महिला होणार ‘इंटरनेट साथी’

By admin | Updated: March 1, 2017 01:23 IST

स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपूर्ण विश्व एका क्लिकवर आले आहे. माहितीचे हे नवीन तंत्रज्ञान गाव,

टॅब आणि मोबाईलची भेट : २४ तास मोफत इंटरनेट, कॅशलेस व्यवहार शिकविणार रूपेश उत्तरवार   यवतमाळ स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपूर्ण विश्व एका क्लिकवर आले आहे. माहितीचे हे नवीन तंत्रज्ञान गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर पोहोचावे म्हणून बचतगटाच्या महिलांना ‘इंटरनेट साथी’ बनविण्यात येत आहे. त्यासाठी गुगल इंडिया, टाटा ट्रस्ट आणि महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिलांना स्मार्ट फोन आणि टॅब मोफत वितरित केले आहे. डिजिटल इंडियाची संकल्पना गावागावात रूजविण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून पावले उचलण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून सर्वसामान्य महिलांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याची धुरा महिला बचतगटांवर सोपविण्यात आली आहे. ‘इंटरनेट साथी’ म्हणून त्या गावपातळीवर काम करणार आहे. या कामात गुगल कंपनी पुढे आली आहे. टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ही मोहीम गावपातळीवर राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बचतगटाच्या ७२ महिलांची ‘इंटरनेट साथी’ म्हणून निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या महिलांना टॅब आणि स्मार्ट फोन मोफत देण्यात आला आहे. या मोबाईलच्या सिमवर २४ तास इंटरनेट सुविधा मोफत राहणार आहे. संपूर्ण कामकाज महिलांना हाताळता यावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. कॅशलेस व्यवहार कसा करायचा, इंटरनेटद्वारे माहिती कशी गोळा करायची, नोकरीच्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत, त्याकरिता अर्ज कुठे भरायचे, शासनाच्या कुठल्या योजना आहेत, कृषी क्षेत्रात नवीन बदल झाले आहेत का, विविध तंत्रज्ञान आदी माहिती देण्यात येणार आहे. एका ‘इंटरनेट साथी’ महिलेला एका महिन्यात २५० महिलांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या महिला गावपातळीवर जाणीवजागृतीचे काम करीत आहे. आतापर्यंत १५ हजार महिलांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम महिलांनी केले आहे. ई-मेल आयडी तयार करण्याचे कामही महिलांनी सुरू केले आहे.