शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

साश्रू नयनांनी राधाला अखेरचा निरोप

By admin | Updated: May 31, 2014 00:11 IST

कालपर्यंत त्या घराला तिचे बोबडे बोल आणि हसतमुख चेहर्‍याची सवय झाली होती. तिच्या हसण्याने घरात आनंदाला उधाण यायचे. मात्र अचानक तिला ताप आला आणि यातच तिची अखेर झाली.

डेंग्यूचा बळी : जवळगावातील प्रत्येक जण हळहळला किशोर वंजारी - नेरकालपर्यंत त्या घराला तिचे बोबडे बोल आणि हसतमुख चेहर्‍याची सवय झाली होती. तिच्या हसण्याने घरात आनंदाला उधाण यायचे. मात्र अचानक तिला ताप आला आणि यातच तिची अखेर झाली. जवळगाव येथील राधा गुघाणे या निष्पाप बालिकेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला आणि गावाचे काळीज थरथरून गेले. तिचे कलेवर गावात आणले तेव्हा प्रत्येकाच्या मनात चर्र होत होते. अखेर नियतीपुढे गावकरी हतबल झाले. जड अंत:करणाने आणि साश्रू नयनांनी जवळगावकरांनी राधाला अखेरचा निरोप दिला.नेर तालुक्यातील जवळगाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. यापूर्वीसुद्धा एका बालिकेचा मृत्यू झाला. गावामध्ये तापाने फनफनणारी अनेक बालके असल्यामुळे गावात भीतीयुक्त वातावरण आहे. अनेकांनी आपल्या मुलांना परगावी नेवून ठेवले आहे. आरोग्य विभागाने गावामध्ये शिबिर लावले होते. कोरडा दिवसही पाळण्यात आला होता. मात्र मृत्यूचे हे तांडव थांबायला तयार नाही. कोवळ्या कळ्या अचानक मृत्यूच्या खाईत लोटल्या जात आहे. राधाच्या मृत्यूने संपूर्ण गाव हादरले आहे. राधा अनेकांची लाडकी होती. न बोलाविता कुणाच्याही घरी जावून आपल्या बोबड्या बोलांनी ती अनेकांना मोहीत करायची. राधा गेल्याची वार्ता ऐकताच गावाच्या अंत:करणात गलबल झाली. अनेकांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली. आपल्या लाडक्या लेकीच्या मृत्यूने राधाचे आई-वडील स्तब्ध झाले आहेत. कालपर्यंत अंगाखांद्यावर खेळणारी चिमुकली अचानक निघून गेल्यामुळे राधाच्या आई-वडिलांना सुचेनासे झाले आहे. राधावर नुकतेच जवळगाववासीयांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. कुठल्याही लोकप्रतिनिधीला याची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून गावात डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू आहे. जिल्ह्याचा आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीचे राजकारण विकासाच्या आड येत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी गावात अस्वच्छतेने कहर केला आहे. या आजाराचे मूळ काय, हे अजूनही लक्षात आले नसले तरी राधाचा झालेला मृत्यू हा डेंग्यू या आजारानेच झाला आहे. जवळगावपासून प्राथमिक आरोग्य केंद्र २५ किलोमीटर अंतरावर आहे. नागरिकांना पायपीट करत तेथे जावे लागते. राधाच्या मृत्यूच्या पार्श्‍वभूमीवर जवळगाववासीयांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची मागणी केली आहे. प्रशासन आणखी किती राधाच्या बळी जाण्याची वाट पाहात आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जावू लागला आहे.