शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

रेती चोरट्यांंना अभय

By admin | Updated: July 31, 2016 01:11 IST

राजाश्रय असलेल्या काही लोकांनी सुरू केलेली रेतीची तस्करी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडण्यास कारणीभूत ठरत आहे.

केवळ दोघांना दंड : नेर येथे जप्त केली ६०० ब्रास रेती नेर : राजाश्रय असलेल्या काही लोकांनी सुरू केलेली रेतीची तस्करी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडण्यास कारणीभूत ठरत आहे. शिवाय प्रशासनाकडूनही अशा लोकांची पाठराखन केली जात आहे. मोठ्या प्रमाणात रेतीचोरी पकडूनही नाममात्र लोकांवर कारवाई केली जाते. प्रत्यक्ष चोरी सापडूनही इतरांना कारवाईपासून दूर ठेवले जाते. असाच प्रकार तालुक्यात घडत आहे. रेती तस्करी आणि रेतीचे साठे याबाबी तालुक्यात नवीन नाही. पण कारवाई अपवादानेच होते. वरिष्ठांकडून आदेश धडकताच थातूरमातूर कारवाई केली जाते. रेतीची साठवणूक करणाऱ्यांवर किती दंड आकारायचा याविषयी कुठलेही धोरण तालुका महसूल प्रशासनाकडे नाही. शिवाय कारवाईला काही मर्यादाही पाळल्या जात नाही. मागील काही दिवसात रेती चोरी प्रकरणी आठ जणांना पकडण्यात आले. यातील केवळ दोघांना एक लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. उर्वरित सहा जणांवर महिना लोटूनही कारवाई झालेली नाही. तालुक्यात आठ व्यावसायिकांकडून ५९९ ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. परंतु केवळ दोन जणांवर झालेली कारवाई संशयाला जागा निर्माण करून देणारी आहे. तहसीलदार एम.एस. गेडाम, मंडळ अधिकारी एस.डब्ल्यू. जोशी, सुधीर आंबेकर, तलाठी जे.पी. गावंडे, एस.आर. माहुरे यांनी ही कारवाई पार पाडली. खुद्द तहसीलदारांनी कारवाई केलेली असताना दंड करण्यासाठी महिनाभराचा कालावधी कसा लागतो, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातही काही लोकांवर झालेली कारवाई केवळ देखावा तर नाही, अशी शंका व्यक्त होत आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)