शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

जेनेरिक औषधांची जादा दराने विक्री

By admin | Updated: June 20, 2017 01:23 IST

औषधी दुकानांतून जेनेरिक औषधांची जादा दराने विक्री होत असून यातून गोरगरीब व सर्वसामान्य ग्राहकांची लूट होत आहे.

पांढरकवडा येथे गोरगरिबांची लूट : अन्न व औषधी प्रशासनाचे व्यावसायिकांना अभयबंडू कर्णेवार । लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : औषधी दुकानांतून जेनेरिक औषधांची जादा दराने विक्री होत असून यातून गोरगरीब व सर्वसामान्य ग्राहकांची लूट होत आहे. मात्र अन्न व औषधी प्रशासन जणू काही वैद्यकीय व्यावसायिकांच्या दावणीलाच बांधल्याचे रूग्णांकडून बोलले जात आहे. गोरगरिबांना कमी दरात औषधी मिळावी, यासाठी विविध कंपन्या जेनेरीक औषधींचे उत्पादन करतात. विविध औषधी दुकानात किरकोळ औषध विक्रीसाठी जनरल काऊंटर चालविले जाते. अशा जनरल काऊंटरवरून जेनेरीक औषधीची विक्री केली जाते. या औषधी दुकानदार मात्र कमी दराने उचलतात व जादा दराने विक्री करून तिप्पट-चौपट रक्कम कमविली जात आहे. विविध मेडीकलमध्ये अशा जनरल काऊंटरवरून जेनेरीक औषधीमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, हिवताप, अशा आजारांसाठी औषध विक्री केल्या जाते. मात्र जेनेरीक औषधी असूनही नामांकित कंपनीप्रमाणेच दर आकारले जातात. यातून सर्वसामान्य औषधी अत्यल्प दराने घाऊक बाजारात उपलब्ध होत असून किरकोळ बाजारात जादा दराने विक्री करून मोठ्या प्रमाणात करचोरी करण्यात येत आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चक्क दिशाभूल होत असून औषधी दुकानचालक ग्राहकांना अशी उत्पादने विकून फसवणूक करीत आहे. सध्या पावसाळ्यास सुरूवात झाली असून रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. दवाखान्यात न जाता थेट औषधी दुकानातून औषधी घेऊन किरकोळ उपचार करून घेणारेही सर्वसामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणात असतात. अशा ग्राहकांच्या माथी जेनेरीक औषधी मारून दुकानचालक मोकळे होतात. किरकोळ आजारावर रामबाण इलाज होत असल्याची बतावणी करून रेकॉर्डवर नसलेल्या औषधी विकून करचोरी करण्यात येत आहे. आदिवासीबहुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण जनता शहरात येऊन औषधी खरेदी करतात. त्यांची अशा प्रकारे हेळसांड होत आहे. शहरातील एखाद्या औषधी दुकानाची तपासणी करण्यात आल्याचे अद्याप पाहण्यात अथवा ऐकण्यात आले नाही. यावरून अन्न व औषधी प्रशासन विभाग किती जागरूक आहे, याची प्रचिती येते. जेनेरीक औषधी विक्रीचा हा गोरखधंदा बंद करण्यासाठी औषधींची ज्यादा दराने विक्री थांबवून हा गोरखंधदा बंद करावा, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.जेनेरिक औषधांची संगणकात नोंदच नाहीविशेष म्हणजे शहरातील अनेक औषधी दुकानांमधील संगणकांमध्ये या औषधी उत्पादनांची नोंदही करण्यात आली नसल्याची माहिती आहे. जेनेरीक औषधी मोठ्या प्रमाणात खरेदी करून परस्पर विक्री करून दररोज हजारो रूपयांची वरकमाई करण्यात येत आहे.