शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रस्त्यांची रुंदी केवळ तीन मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:46 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात नव्याने बांधल्या जात असलेल्या रस्त्यांची रुंदी पाऊण मीटरने घटवून चक्क तीन मीटर करण्यात आली आहे. एवढ्या कमी रुंदीच्या रस्त्यावरून दोन वाहने एकाच वेळी पास होणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्रामसडक योजना : पाऊण मीटरने रुंदी घटविली, जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात नव्याने बांधल्या जात असलेल्या रस्त्यांची रुंदी पाऊण मीटरने घटवून चक्क तीन मीटर करण्यात आली आहे. एवढ्या कमी रुंदीच्या रस्त्यावरून दोन वाहने एकाच वेळी पास होणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या (पीएमजीएसवाय) धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (एमएमजीएसवाय) सुरू करण्यात आली. एमएमजीएसवायचे प्रत्येक काम हे पीएमजीएसवायच्या धर्तीवर करावे, त्याचेच नियम पाळावे, असे बंधन घातले गेले आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे बांधकाम करताना हे नियम दुर्लक्षित केले जात असल्याचे सांगितले जाते. नियमानुसार, ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गांची रुंदी किमान ३.७५ मीटर असणे बंधनकारक आहे. परंतु मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधल्या जात असलेल्या अनेक रस्त्यांची रुंदी अवघी तीन मीटरवर मर्यादित करण्यात आली आहे. ही रुंदी पाऊण मीटरने घटविण्यामागे कोणतेही ठोस कारण सांगितले जात नाही.वास्तविक तीन मीटरचा रस्ता हा प्रकारच कालबाह्य झाला आहे. दोन ट्रक पास होण्यासाठी साडेपाच मीटर रुंदी गरजेची असताना तीन मीटर ग्रामीण रस्त्यावरून ट्रक पास होणार कसे, हाच मूळ प्रश्न आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधीची कमतरता नाही. रस्त्यांना ३० लाखांपासून ८० लाखापर्यंत प्रतिकिलोमीटर दर दिला जातो. असे असताना ग्रामीण रस्त्यांची रुंदी घटविल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. ग्रामीण रस्त्यांची रुंदी घटविली गेली असतानाही जिल्हा परिषदेचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ राजकारणातच मशगुल असलेल्या जिल्हा परिषदेला घटलेल्या रस्त्याच्या रुंदीचे सोयरसूतक नसल्याचे दिसते.एक पाऊल मागे कसे ?कोणतीही योजना अपग्रेड होणे, त्याचे एक पाऊल पुढे पडणे अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना एक पाऊल पुढे जाण्याऐवजी मागे येत असल्याचे रस्त्याच्या घटविल्या गेलेल्या रुंदीवरून दिसून येते. पावणे चार मीटरचा ग्रामीण रस्ता तीन मीटर रुंदीवर आणून काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची संपूर्ण अंमलबजावणी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या नियम व निकषानुसारच करण्याची मागणी बांधकाम क्षेत्रातील एक्सपर्ट व जागरुक नागरिकांमधून पुढे आली आहे.