शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी व विरोधकांत जुंपली

By admin | Updated: May 30, 2014 00:27 IST

आचार संहितेचे उल्लंघन करून सभा घेतल्याने दिग्रस नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकात गुरुवारी चांगलीच जुंपली. शिवसेना नगरसेविकांनी रौद्ररुप धारण केले. प्रश्नांचा भडीमार सुरू झाल्याने नगराध्यक्ष

दिग्रस : आचार संहितेचे उल्लंघन करून सभा घेतल्याने दिग्रस नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकात गुरुवारी चांगलीच जुंपली. शिवसेना नगरसेविकांनी रौद्ररुप धारण केले. प्रश्नांचा भडीमार सुरू झाल्याने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकार्‍यांनी सभागृह सोडले. तर संतप्त नगरसेविकांनी मुख्याधिकार्‍यांना साडी-चोळीचा अहेर केला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक घोषित झाली. या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. दिग्रस तहसीलदारांनी आचार संहितेचे पालन करण्याचे आदेश नगर परिषदेसह सर्वांना दिले आहे. मात्र असे असताना दिग्रस नगर परिषदेने नगरसेवकांची सभा घेऊन ९५२ घरकुलाला बांधकामाची मुदतवाढ देण्यासह इतर ठराव मंजूर केले. विरोधी गटाच्या नगरसेवकांना नगरपरिषदेने सभा मंजूर झाल्याची सूचना दिली होती. परंतु सत्तारुढ गटाने विरोधी नगरसेवकांना अंधारात ठेवले. परंतु सभा सुरू होताच विरोधी नगरसेवक त्याठिकाणी पोहोचले. आणि सत्ताधारी  व विरोधकात चांगलीच जुंपली.नगरपरिषदेमध्ये गुरुवात २९ मे रोजी ११ वाजता नगरसेवकांची बैठक असल्याची कुणकुण शिवसेनेच्या नगरसेवकांना लागली. शिवसेना गटनेते सुभाष अटल यांनी नगरसेवकांना निरोप देऊन नगरपरिषदेमध्ये बोलावले. सर्व नगरसेवक एकत्र आल्यावर त्यांनी सभागृहात धाव घेतली. परंतु तोवर सत्तारुढ गटाने विषयसूचीतील विषयांना मंजुरी दिली. त्यावर विरोधकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. आचारसंहिता असल्याने सभा रद्द म्हणून आम्हाला कळविण्यात आले. त्यानंतरही सभा कशी घेतली म्हणून गोंधळ सुरू झाला. दरम्यान नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविकांनी रौद्ररुप धारण केले. रद्द झालेली सभा आचारसंहिता असताना कशी घेतली, याचा जाब विचारत मुख्याधिकार्‍याच्या कक्षात ठिय्या दिला. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी शिवसेनेच्या नगरसेविकांना तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले. त्यावर नगरसेविकांनी आम्हाला मुख्याधिकार्‍यांनाच जाब विचारायचा आहे, असे सांगितले. त्यानंतर मुख्याधिकार्‍यांशी मोबाईलवरून संपर्क साधला असता यवतमाळला निघाल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेविकांनी मुख्याधिकार्‍यांच्या कक्षातील खुर्चीला साडी-चोळी व बांगड्यांचा अहेर केला. सभागृह सोडून जाताना नगराध्यक्ष संजीवनी कोळशे यांना विचारणा केली असता, त्यांनाच विचारा, असे बोलून त्या निघून गेल्या. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना मोबाईलवरून विचारणा केली असता दोन्ही गटातील नगरसेवकांचा अंतर्गत मामला असल्याचे सांगितले. गुरुवारी सभा होऊन ठराव पास झाल्याचे व पवार नामक अधिकार्‍यांकडे त्याची माहिती असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले. एकंदरित दिग्रस नगरपरिषदेतत सत्तारुढ व विरोधकात चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)