शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओं’नी उडविली तारांबळ

By admin | Updated: December 19, 2015 02:27 IST

येथील विश्रामगृहात शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शिबिर घेण्यात आले. या शिबिरामुळे वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली.

वाहनांची रांग : वणी येथील विश्रामगृहात भरली वाहनांची जत्रावणी : येथील विश्रामगृहात शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शिबिर घेण्यात आले. या शिबिरामुळे वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. खुद्द ‘आरटीओं’नीच तारांबळ उडविल्यामुळे गोची झाली. येथे दर महिन्याला उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे निश्चित तारखेला वाहन चालक परवाना, वाहन तपासणी शिबिर घेतले जाते. शुक्रवारी विश्रामगृहात हे शिबिर घेण्यात आले. त्यासाठी सकाळपासूनच वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहनधारक विश्रामगृह परिसरात दाखल होऊ लागले होते. परिणामी सकाळी ११ वाजतापर्यंत विश्रामगृहाला वाहनांच्या जत्रेचे स्वरूप आले होते. सर्व दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी होती. आरटीओ विभागाचे अधिकारी, कर्मचारी आल्यानंतर शिबिराला सुरूवात झाली. यावेळी चालक परवाना, वाहन पासींग आदींसाठी वाहनधारकांची मोठी रांग लागली होती. बाजूला सर्व वाहने उभी होती. विश्रामगृहाच्या प्रवेशव्दारापासून शिबिरस्थळी पोहोचण्यासाठी वाहनधारकांनाच कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या दोन्ही कडेला अस्ताव्यस्त वाहने उभी असल्याने मागाहून येणाऱ्या वाहनधारकांना विश्रामगृहात प्रवेश करणेही कठीण झाले होते. येथील विश्रामगृहात माणसे कमी आणि वाहनेच जादा दिसत होती. मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाने शिबिरासाठी कोणतीही खास व्यवस्था केली नव्हती. एवढेच नव्हे, तर वाहनधारकांनाही वाहन कसे व कुठे पार्किंग करावे, याबाबत साधी सूचना दिली गेली नाही. त्यामुळे शुक्रवारी येथील विश्रामगृह परिसराला वाहनांच्या जत्रेचे स्वरूप आले होते. (कार्यालय प्रतिनिधी)संपामुळे प्रवाशांची कुचंबणागुरूवारपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे येथील आगारातून एकही बस सुटली नाही. परिणामी प्रवासी खासगी वाहतुकीवर अवलंबून होते. त्यातच शुक्रवारी येथे शिबिर झाले. या शिबिरात मोठ्या प्रमाणात आॅटो आणि चारचाकी वाहने विविध कामासाठी आली होती. त्यामुळे नेहमी निश्चित मार्गावर धावणारी अनेक वाहनेही बंद होती. त्याचा फटका प्रवाशांना बसला. एसटी बंद असल्यामुळे बहुतांश प्रवासी याच वाहनांवर अवलंबून होते. मात्र त्यापैकी बहुतांश वाहने तपासणीसाठी आल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. खुद्द ‘आरटीओं’नीच प्रवाशांची तरांबळ उडविली, असे काही प्रवासी सांगत सुटले होते. पुढील शिबिर घेताना वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, याची दक्षता घेणे आता गरजेचे झाले आहे.