शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ दलालावर गुन्हा

By admin | Updated: December 20, 2015 02:34 IST

वाहनधारकांच्या सुविधेसाठी तालुकास्तरावर सुरू झालेल्या आरटीओ कॅम्पलाही दलालांनी ग्रासल्याचे आता सिद्ध झाले आहे.

राळेगावात कॅम्प : जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देताच तालुका प्रशासन हादरलेराळेगाव : वाहनधारकांच्या सुविधेसाठी तालुकास्तरावर सुरू झालेल्या आरटीओ कॅम्पलाही दलालांनी ग्रासल्याचे आता सिद्ध झाले आहे. राळेगाव येथे शनिवारी आयोजित कॅम्पमध्ये एका वाहनधारकाकडून अधिकची रक्कम उकळणाऱ्या दलालावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी या कॅम्पला भेट दिल्याने झालेल्या हालचालीनंतर ही कारवाई झाली आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीचे व्हावे याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तालुका पातळीवर कॅम्प घेण्यात येत आहे. यवतमाळ कार्यालयाप्रमाणेच तालुका पातळीवरील कॅम्पमध्येही दलालांची चलती असल्याच्या बाबी अनेकदा पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे दलालांमार्फत आलेल्या प्रकरणांना आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही अडविले जात नव्हते. कॅम्प बाहेरच दलालांनी आपला ठिय्या मांडला होता. शासकीय शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेवून नागरिकांची आर्थिक लूट केली जात होती. या बाबीच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत झाल्या. शनिवारी येथे आयोजित बैठकीनिमित्त जिल्हाधिकारी दाखल झाले होते. सायंकाळी ५ वाजता त्यांनी आरटीओ कॅम्पला भेट दिली. यावेळी मोटर वाहन निरीक्षक साजन शेंडे यांच्याकडे त्यांनी चौकशी केली. दलालांविषयी माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, साजन शेंडे यांनी एका दलालाचा भ्रमणध्वनी क्रमांकही विनाविलंब दिला. यावरून त्यांचे दलालांशी लागेबांधे असल्याचे स्पष्ट झाले. तेथूनच खऱ्या अर्थाने दलालांविरोधात कारवाईला सुरुवात झाली. दरम्यान, कळंब येथील रवींद्र हरिभाऊ भोयर या वाहनधारकाने पोलिसात तक्रार दिली. महंमद फारूख महंमद मुश्ताक (यवतमाळ) या दलालाने आपल्याकडून ३०० रुपये आणि कागदपत्र घेतले. पावती मात्र केवळ ६० रुपयांची देण्यात आली, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले. यावरून महंमद फारूख याच्याविरुद्ध राळेगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या आवारात आरटीओ कॅम्प घेतला जात आहे. प्रत्येकवेळी दलालांची चलती राहिली आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने शनिवारी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. यापूर्वीही दलालांच्या कारवाया आणि आरटीओ विभागाकडून मिळणारे पाठबळ या बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. (प्रतिनिधी)