शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीआय’ कार्यकर्ता अपघातात ठार

By admin | Updated: May 24, 2016 00:03 IST

भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आरटीआय संघटनेचे तालुकाध्यक्ष ठार झाल्याची घटना ....

पांढरकवडाची घटना : घातपाताचा संशयपांढरकवडा : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आरटीआय संघटनेचे तालुकाध्यक्ष ठार झाल्याची घटना येथील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात नसून खून असल्याचा संशय व्यक्त करीत पांढरकवडा पोलिसात भावाने तक्रार दिली आहे.सुभाष हेमचंद सुराणा (४०) रा. पांढरकवडा असे मृत आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. सुभाष रविवारी सायंकाळी ७ वाजता उमरी नजीक असलेल्या आपल्या शेतात जाण्यासाठी दुचाकीने निघाले. त्यानंतर शेतातून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. हा प्रकार लक्षात येताच पांढरकवडा पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान नरेश मिठ्ठूलाल सुराणा यांनी हा अपघाती मृत्यू नसून नियोजनबद्ध रितीने सुभाषला संपवून टाकल्याची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्या शेताचा वादही न्यायालयात सुरू होता. नुकताच या प्रकरणाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला होता. तसेच त्यांनी माहिती अधिकाराअंतर्गत तालुक्यातील अनेक प्रकरणांची माहिती बाहेर काढली होती. त्यामुळेच त्यांचा कुणी तरी खून केला असावा असा आरोप आहे. दरम्यान पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून अधिक तपास गुलाबराव वाघ करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)