शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेव्ह हार्ट’मधील पित्याची भूमिका अविस्मरणीय

By admin | Updated: May 14, 2017 01:13 IST

‘श्वास’ हा पहिलाच चित्रपट आणि त्याच चित्रपटामुळे मला प्रसिद्धी मिळाली. आॅस्करपर्यंत गेलेल्या

अरुण नलावडे : प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने यवतमाळ भेटीत उलगडला कलाप्रवास काशीनाथ लाहोरे । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : ‘श्वास’ हा पहिलाच चित्रपट आणि त्याच चित्रपटामुळे मला प्रसिद्धी मिळाली. आॅस्करपर्यंत गेलेल्या या मराठी चित्रपटाला ‘सुवर्ण कमळ’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खरे म्हणजे इयत्ता पाचवीपासूनच मी चित्रपटात कामे करीत आहे. आतापर्यंत १०० चित्रपटातून अभिनय केला. परंतु नाव झाले ते ‘श्वास’मुळेच. असे असले तरी ‘ब्रेव्ह हार्ट’ या चित्रपटात लहान मुलाचे एक-एक अवयव निकामी होत असतानाचा असहाय पिता ही भूमिका माझ्या आजपर्यंतच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय आहे, असे मत प्रसिद्ध मराठी अभिनंते अरुण नलावडे यांनी व्यक्त केली. ‘ग्रीन अँड क्लिन सिटी’ हा पर्यावरणावर आधारित मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी नलावडे यवतमाळ येथे आले होते. या चित्रपटात विनोद काळे, संजय माटे, दशरथ मडावी, चारूलता पावसेकर, अ‍ॅड. चानेकर आदी स्थानिक कलावंतही भूमिका करीत आहेत. मराठी चित्रपटात विविधांगी भूमिका केल्याबद्दल यावर्षी नलावडे यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या लोकप्रिय असलेली मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यात त्यांची नानाजींची भूमिका आहे. दिग्दर्शक राज दत्त आणि नलावडे यांच्या हंस प्रॉडक्शनतर्फे शुक्रवारी ‘हाक’ हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. जैतापूर अनुऊर्जा प्रकल्पाची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. वेश्यांच्या मुलांच्या पुनर्वसनावर आधारित ‘वारसा’ हा त्यांचा उल्लेखनीय चित्रपट, तर वैदर्भीय भूमीवरचा ‘तानी’ हा त्यांचा चित्रपटही वेगळा आहे. ‘का रे दुरावा’, ‘वादळवारा’, ‘आभाळ माया’, ‘अवघाचि संसार’ आदी सात मराठी आणि तीन हिंदी मालिकांमधून नलावडे यांनी भूमिका केल्या आहेत. मराठी चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, आजकाल वाहिन्यांनी निर्माण केलेले चित्रपट चालतात. ‘सैराट’सारखा चित्रपट प्रचंड यश मिळवितो आणि दर्जेदार कलात्मक चित्रपट मागे पडतात ही शोकांतिका आहे. प्रेक्षकांनाही धांगडधिंगाच आवडतो, असे वाटू लागले आहे. अरुण नलावडे मूळचे कोकणातील. संगमनेर तालुक्यातील करजुवे हे त्यांचे गाव. कोकणात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ ही त्यातलीच एक मालिका होती. विशेष म्हणजे, सर्वस्तरातील मंडळी ही मालिका पाहात होते.