शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस, सरकार काय तोडगा काढणार?
3
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
4
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
5
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
6
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
7
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
8
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
9
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
10
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
11
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
12
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
13
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
14
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
15
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
16
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
17
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
18
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
19
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
20
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

रोहयो कंत्राटदार शिरले जंगलात

By admin | Updated: April 10, 2015 00:11 IST

पांढरकवडा वन प्रशासनाच्या ताठर भूमिकेमुळे तेथील रोजगार हमी योजना आणि जिल्हा नियोजन निधीवर जगणाऱ्या कंत्राटदारांची कोंडी झाली आहे.

लोकमत विशेषयवतमाळ : पांढरकवडा वन प्रशासनाच्या ताठर भूमिकेमुळे तेथील रोजगार हमी योजना आणि जिल्हा नियोजन निधीवर जगणाऱ्या कंत्राटदारांची कोंडी झाली आहे. अखेर या कंत्राटदारांनी जंगलात एन्ट्री केली असून तेथे बेसुमार सागवान वृक्षतोड केली जात आहे. हे चोरीतील सागवान लगतच्या तेलंगणा-आंध्र प्रदेशात तस्करीद्वारे पाठविले जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील बोगस कामांमुळे पांढरकवडा वनविभागाची ‘ख्याती’ मुंबई-दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. तत्कालीन डीएफओ आणि त्यांचे अधिनस्त एसीएफ, आरएफओ, वनपाल, वनरक्षक ही यंत्रणा त्यासाठी जबाबदार आहे. त्यांना महसूल व डाक विभागाच्या यंत्रणेचाही हातभार लागला. त्यानंतर पांढरकवडा वनविभागाची सूत्रे उपवनसंरक्षक गिऱ्हेपुंजे यांच्याकडे सोपविली गेली. त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात प्रशासकीय ताठरता कायम ठेवली. रोजगार हमी योजना आणि जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधीतून गिऱ्हेपुंजे यांनी जंगलात पाणलोटची कामे घेणे बंद केले. त्याऐवजी त्यांनी वनीकरण व कुपाच्या कामावर भर दिला. पाणलोटच्या कामात मोठा मलिदा मिळत असल्याने कंत्राटदारांच्या उड्या पडत होत्या. मात्र ती कामेच बंद झाल्याने हे कंत्राटदार जणू बेरोजगार झाले. गिऱ्हेपुंजे यांच्या बदलीनंतर तरी नव्या अधिकाऱ्याला आपण पाणलोट कामांसाठी मॅनेज करू, असा या कंत्राटदारांचा मनसुबा होता. मात्र गिऱ्हेपुंजे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर आलेले नवे आयएफएस अधिकारीसुद्धा ताठर असल्याने या कंत्राटदारांची कोंडी आणखी वाढली. म्हणून या कंत्राटदारांनी आता सागवान तस्करीवर लक्ष केंद्रीत केले. झरी, पांढरकवडा, उमरी वन क्षेत्रातील हे बहुचर्चित पांढरपेशे कंत्राटदार आता जंगलात शिरले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात सागवान तोड चालविली आहे. कनिष्ठ वन यंत्रणेशी संगनमत करून सागवान तोड व तस्करी सुरू आहे. हे कंत्राटदार केवळ पांढरकवडाच नव्हे तर यवतमाळ वनविभागातही आपली ‘कामगिरी’ बजावत आहे. वडगाव (जंगल) वन परिक्षेत्रातील वाकी दुधाना, येळाबारा या सर्कलमध्ये वन खात्याने सहा ते सात मीटर सागवान जप्त केले. या सागवानावरील हातोडे संशयास्पद आहे. वनपाल व सहायक वनसंरक्षकाने हे हातोडे लावल्याचे दिसून येते. हातोडे वडगाव वनपरिक्षेत्रातील आणि ट्रान्सपोर्ट पास पांढरकवड्याची असा उफराटा कारभार पुढे आला आहे. घाटंजी, जोडमोहा, अकोलाबाजार या भागात ही वृक्षतोड केली जात आहे. त्याची मोठी साखळीच निर्माण झाली आहे. पुसद वनविभागातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्यासाठी वनखात्यातील अधिकाऱ्यांची सागवान तस्करांशी असलेली मिलीभगत कारणीभूत ठरली आहे. यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांच्यासाठी तीनही वनपरिक्षेत्रातील ही वृक्षतोड आव्हान ठरली आहे. जिल्ह्यातील दोन डीएफओ ‘नॉन करप्ट’ आहेत. मात्र त्यांच्या अधिनस्त यंत्रणेतील बहुतांश जण ‘मोस्ट करप्ट’ असल्याने कारवाईत आणि सागवान तोड व तस्करी रोखण्यात अपयश येत आहे. (प्रतिनिधी)