शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दडीने पिके धोक्यात

By admin | Updated: August 14, 2014 00:08 IST

दुबार, तिबार पेरणीने हवालदिल झालेल्या बळीराजापुढे आता पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यात येण्याचे संकट निर्माण झाले आहे. जमीन कडक आल्याने कोवळी रोपं जगवायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

निश्चल गौर - डोंगरखर्डा दुबार, तिबार पेरणीने हवालदिल झालेल्या बळीराजापुढे आता पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यात येण्याचे संकट निर्माण झाले आहे. जमीन कडक आल्याने कोवळी रोपं जगवायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. दोन पेरण्यांसाठी झालेल्या अवाढव्य खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षी निसर्गाची अवकृपा सातत्याने सुरू आहे. सुरुवातीला दोनही नक्षत्रात पावसाने दडी मारली. थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र १५ ते २० दिवसपर्यंत पावसाचा थेंबही न आल्याने बियाणे जमिनीतच गाडली गेली. यासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज अंगावर बसले. यातूनही सावरत खासगी सावकार किंवा इतर ठिकाणाहून पैशाची जुळवाजुळव करत दुबार पेरणी केली. आता गेली काही दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहे. परिसराच्या नांझा, डोंगरखर्डा, मेटीखेडा, जोडमोहा आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कपाशी आणि सोयाबीनचे पीक घेतले आहे. काही शेतकऱ्यांना तिबार पेरणीही करावी लागली. वेळोवेळी पेरण्या उलटल्याने खर्चाची बाजू कमकुवत होत गेली. आताही पावसाची कुठलीही चिन्हे दिसत नाही. रोपं माना टाकत आहे. जमीन कडक आल्याने रोपाच्या मुळा सोकत चालल्या आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकणार आहे.हीच परिस्थिती राहिल्यास पहिल्या पेरणीसाठी घेतलेले बँकेचे कर्ज, दुसऱ्या पेरणीसाठी सावकारांकडून घेतलेली कर्जाऊ रक्कम आणि वर्षभराचा गाडा चालवायचा कसा याची चिंता आतापासूनच शेतकऱ्यांना लागली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र पाऊस कमी झाल्याने शेतातील जलस्रोतही फार काळ टिकेल याची शास्वती नाही. गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवूनही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अनेकांनी यावर्षी पीक विम्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. आता उन्हामुळे पिके होरपळत आहे. गतवर्षीचा पीक विमा त्वरित लागू करून वाटप करावा आणि यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.